Schools Closed Friday: पुणे, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्टमुळे प्रशासनाचा निर्णय

Schools closed in Thane, Navi Mumbai Tomorrow : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह या जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्टमुळे प्रशासनाचा निर्णय
Schools Closed FridaySaam Tv
Published On

मुसळधार पावसाने राज्यभरात दाणादाण उडवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे. येत्या 24 तासांत पावसाचा असाच थैमान सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आता नवी मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा रेड अलर्ट असल्यानं प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्टमुळे प्रशासनाचा निर्णय
Milk Adulteration: दुध भेसळखोरांविरोधात होणार कठोर कारवाई, राज्य सरकार करणार स्वतंत्र कायदा

दरम्यान, ठाणे शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात 180 मिमी इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामानखात्याने रेड ॲलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. आज झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देवून दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच उद्या देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरीत शाळांना सुट्टी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे व हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टमुळे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

पुणे, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्टमुळे प्रशासनाचा निर्णय
Video : सांगलीत वारणा नदीच्या काठावर अजस्त्र मगर, नुसता व्हिडिओ बघाल तरी धडकी भरेल!

सांगलीतही शाळांना सुट्टी

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढती पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत उद्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिराळा, पलूस, वाळवा आणि मिरज तालुक्यातल्या सर्व शाळा/ महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातल्या रेड अलर्ट व वारणा, कृष्णा नद्यांची वाढती पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी ही घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com