शाळेची घंटा वाजली! विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत...

तब्बल दीड ते पावणे दोन वर्षांनंतर शासनाच्या निर्देशानुसार आज शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.
शाळेची घंटा वाजली! विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत...
शाळेची घंटा वाजली! विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत...दीपक क्षीरसागर
Published On

लातूर: तब्बल दीड ते पावणे दोन वर्षांनंतर शासनाच्या निर्देशानुसार आज शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे. शाळा प्रशासन, शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी केली आहे. (School starts in the state from today, students are spontaneously welcomed)

हे देखील पहा -

शहरी भागात ८ वी ते १२ वी चे वर्ग तर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचं थर्मल स्कॅनिंग केले गेले आणि सॅनिटायझर सर्वांना हातावर देऊन मास्कसह शाळेत प्रवेश दिला. औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक शरणप्पा जलसकरे उपमुख्याध्यापक योगेश पकाले पर्यवेक्षक गौतम माशाळकर यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.

शाळेची घंटा वाजली! विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत...
Farmer Suicide; शेतकरी आत्महत्या थांबणार कधी? एकाच गावात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आज अनेक विद्यार्थ्यांनी तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शिक्षकांना आणि आपल्या मित्र-मैत्रिणीला भेटले त्याचा आनंद मोठा होता. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यातील शाळा या आजपासून सुरु झाल्या आहेत. आता महाविद्यालयं कधी सुरु होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com