बीड - आजपर्यंत आपण फी साठी तगादा लावणाऱ्या शाळा, संस्था आणि संस्थाचालक पाहिले असतील. मात्र कोरोना काळात तब्बल 200 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेने, माणुसकीचं दर्शन घडवत, या 200 विद्यार्थी मुलांकडून गेल्या 2 वर्ष एकही रुपया फि घेतली नाही. सध्या सगळीकडे फि साठी तगादा लावला जात असल्याने पालक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे या शाळाने कोरोनाच्या संकटात एकही रुपया फी घ्यायची नाही. असा निश्चय देखील केला आहे. A school that provided free education to two hundred children during the Corona period
आष्टी तालुक्यात असणाऱ्या, बावी गावातील स्वामी विवेकानंद विद्यालय नावाच्या या शाळेने प्रामाणिक शिक्षणाचे मूल्य जपत, कोरोनाच्या काळात पूर्ण फी माफ केली आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेऊन सुद्धा, असा महत्वाचा निर्णय शाळेने घेतला आहे. जोपर्यंत कोरोना व लॉकडाऊन असेल तोपर्यंत पालकांकडून एक रुपयाही फी न घेण्याचा पवित्राचं या शाळेने घेतला आहे.
हे देखील पहा -
ग्रामीण भागात शाळा असूनही शाळेत मोठी विद्यार्थी संख्या असताना, असा विचार आणि या अडचणीच्या परिस्थितीत असा उत्कृष्ट संदेशच या शाळेने दिला आहे. मुख्याध्यापक कुंडलिक लटपटे यांनी असा निर्णय घेऊन गुरु कसा असावा ! याचे उत्तम आदर्श उदाहरण यातून दाखवले आहे.
या शाळेकडून गेल्या दीड वर्षापासून, ऑनलाईन 200 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सुरू असून जोपर्यंत प्रत्यक्षात शाळा सुरू होत नाहीत, आणि कोरोनाचे संकट टळत नाही. तोपर्यंत फी घेणार नसल्याचं, शाळेतील शिक्षकांनी सांगितलं आहे आहे.
स्वामी विवेकानंद विद्यालयाने या कोरोनाच्या काळात, फि माफीचा निर्णय घेतलाय. हा पालकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा निर्णय आहे. या कोरोनाच्या काळात दोन वर्षात, पूर्ण व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे या शाळेने फि माफ करून मोठा आधार दिला असून शाळेकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण दिले जात आहे. आमच्या डोंगराळ भागांमध्ये या शाळेमुळं पालक वर्गाला मोठा आधार मिळाला आहे. असे मत पालकांनी व्यक्त केलं आहे
दरम्यान गेल्या दीड वर्षापासून या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे दिले जात असून, स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करून घेतली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून विद्यार्थी खूष आहेत.
दरम्यान कोरोनाच्या संकटांनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना, शाळांकडून विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात तगादा लावला जात आहे. यामुळे पालक वर्गात फि कशी भरावी ? मुलाचं शिक्षण कसं करावं ? असा प्रश्न असल्याने आक्रमक पवित्रा देखील घेतला जात आहे. त्यामुळे एकीकडे हजारो शाळा फिसाठी तगादा लावत आहेत.
तर दुसरीकडे या डोंगराळ भागात वसलेल्या या शाळेनं, 200 विद्यार्थ्यांच्या पालकांना फी माफ करून आधार देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. यामुळे या शाळेसह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांचा आदर्श इतर शाळा व शिक्षकांनी घ्यावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.