'30 लाख द्या अन्यथा बॉम्ब ने उडवून देऊ'; सातारच्या मोदींना धमकीचे फोन

सातार्‍यातील मिठाई व्यवसायिकाला confectioner गेल्या 8 दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल International Call येत असून 30 लाख रुपयांची खंडणीची Ransom मागणी केली जात आहे.
'30 लाख द्या अन्यथा बॉम्ब ने उडवून देऊ'; सातारच्या मोदींना धमकीचे फोन
'30 लाख द्या अन्यथा बॉम्ब ने उडवून देऊ'; सातारच्या मोदींना धमकीचे फोनओंकार कदम
Published On

ओंकार कदम

सातारा: सातार्‍यातील मिठाई व्यवसायिकाला confectioner गेल्या 8 दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल International Call येत असून 30 लाख रुपयांची खंडणीची Ransom मागणी केली जात आहे. पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात Satara City खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिस मुख्यालयात police headquarters तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

हे देखील पहा-

तक्रार अर्ज दाखल केलेल्या व्यवसायिकाचे नाव प्रशांत मोदी असे आहे. माहितीनुसार, दिवाळीपासून त्यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. त्यावर, 30 लाख रुपये दे अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन त्यांना अशी धमकी मेसेजद्वारे देण्यात येत आहे. सुरुवातीला प्रशांत मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्यांना रात्री-अपरात्री देखील फोन येऊ लागले. तसेच मेसेज करुन वारंवार 30 लाख रुपये देण्यासाठी धमकावले जाऊ लागले.

सुमारे 10 ते 12 कॉल आणि मेसेज आल्याने मोदी यांनी सातारा पोलिस मुख्यालयात याबाबत ई -मेल (E-Mail) करुन तक्रार अर्ज पाठवला. या तक्रार अर्जात आलेले फोन नंबर, मेसेज याचे स्क्रीन शॉट देखील जोडून पाठवण्यात आले. त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, येणार्‍या या धमकीमुळे त्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे आणि मला दोन नंबर वरुन एकाच प्रकारची धमकी दिली जात आहे.

'30 लाख द्या अन्यथा बॉम्ब ने उडवून देऊ'; सातारच्या मोदींना धमकीचे फोन
जनावरांची कुट्टी जिवावर बेतली; मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू

सातारा पोलिसांनी सर्व माहिती घेवून तपासाला सुरुवात केली. सर्व बाजूने याचा तपास होत आहे. दरम्यान, सातार्‍यातील व्यवसायिकाला 30 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केलं जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. असून पोलीस आता कसून चौकशी सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com