एसटी कर्मचारी रुजू; सातारा - स्वारगेट विना थांबा सेवेस प्रारंभ

वरिष्ठ स्तरावर जाे निर्णय हाेईल ताे हाेईल परंतु कर्मचा-यांनी कामावर आल्यास प्रवाशांना सेवा देता येईल.
MSRTC Bus
MSRTC BusSaam Tv
Published On

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) कर्मचा-यांनी कामावर रुजू व्हावे असे सातत्याने परिवहन मंत्री अनिल परब हे करीत आहेत. त्यास प्रतिसाद देत एसटी महामंडळाच्या सातारा विभागातील काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती सातारा आगार व्यवस्थापक रेशमा गाडेकर यांनी दिली. दरम्यान आज (मंगळवार) सातारा - स्वारगेट ही एसटी महामंडळाची बस पुण्याला रवाना झाली. त्यामुळे नाेकरदार आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

MSRTC Bus
काली चरण महाराज भवानी मातेच्या दर्शनास; उदयनराजेंची उपस्थिती

सातारा आगार व्यवस्थापक गाडेकर म्हणाल्या साधारणतः २२ दिवसांनी एसटी महामंडळाची बस ज्याला आपण लालपरी असे म्हणताे त्या दाेन बस पुण्याला रवाना झाल्या आहेत. यापुर्वीपासून शिवशाही बस देखील पुण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. आजपासून आपण काही ठिकाणी फे-या सुरु झाल्या आहेत.

सातारा साताराराेड या मार्गावर देखील बसची फेरी झाली. हळूहळू जिल्ह्यातील इतर ठिकाणी बस सेवेस प्रारंभ हाेईल असा विश्नास गाडेकर यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या कर्मचा-यांनी कामावर यावे प्रवाशांना सहकार्य करावे. वरिष्ठ स्तरावर जाे निर्णय हाेईल ताे हाेईल परंतु कर्मचा-यांनी कामावर आल्यास प्रवाशांना सेवा देता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com