Satara Politics: साताऱ्यात 'तुतारी'चा भाजपला धक्का? जयंत पाटलांनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड तासभर चर्चा

Maharashtra Politics Latest News: वाई विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची राज्यसभेवर निवड होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर मदन भोसले हे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Satara Politics: साताऱ्यात 'तुतारी'चा भाजपला धक्का? जयंत पाटलांनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड तासभर चर्चा
Maharashtra Politics Latest News: Saamtv
Published On

सातारा, ता. २५ ऑगस्ट २०२४

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असतानाच शरद पवार यांनी राजकीय डावपेच आखायला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह महायुतीमधील अनेक बडे नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. त्यामुळे विधानसभेआधी अनेकजण तुतारी हाती घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. अशातच साताऱ्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते मदन भोसले यांची भेट घेतली. वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वाई विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची राज्यसभेवर निवड होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर मदन भोसले हे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मदन भोसले यांनी भाजपची साथ सोडून तुतारी हाती घेतल्यास पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का बसू शकतो.

Satara Politics: साताऱ्यात 'तुतारी'चा भाजपला धक्का? जयंत पाटलांनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड तासभर चर्चा
Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा कहर! गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर, रामकुंडाचा परिसर पाण्याखाली; सतर्कतेचा इशारा

दुसरीकडे, माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. यशराज भोसले हे माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात असून त वाई खंडाळा मतदारसंघात विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. तसेच यशराज भोसले यांनी मकरंद पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची शरद पवार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली असून लवकरच करणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Satara Politics: साताऱ्यात 'तुतारी'चा भाजपला धक्का? जयंत पाटलांनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड तासभर चर्चा
Pune Rain: पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून वेगाने विसर्ग सुरू, पुलाची वाडी परिसरात पाणी शिरलं, प्रशासन अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com