Satara News : पोहायला गेले पुन्हा परतलेच नाही, विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

Karad News : साताऱ्यातील कराड तालुक्यातील दुर्घटना घडली आहे. विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचादेखील बुडून मृत्यू झाला.
Satara News
Satara NewsSaam Tv
Published On

संभाजी थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी

विहीरीमध्ये पोहायला जाणं साताऱ्यामधल्या एका तरुणाला भोवले आहे. पोहणं शिकत असलेल्या तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यातील करवडी गावात घडली आहे. एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजवर्धन किशोर पाटील हा २२ वर्षीय तरुण गावी आला होता. पोहायला शिकण्यासाठी तो विहिरीत उतरला होता. पण काही कारणामुळे तो बुडायला लागला. त्याला वाचवण्यासाठी ५५ वर्षीय राजेंद्र दादा कोळेकर यांनीही विहीरीत उडी मारली. राजवर्धनला वाचवण्याचा राजेंद्र यांनी प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नात दोघांचाही मृत्यू झाला.

राजवर्धन हा आळंदी, पुणे येथील एमआयटीमद्ये कॉम्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. सुट्टीच्या निमित्ताने तो गावाला आला होता. पोहण्याच्या प्रयत्नात राजवर्धन आणि राजेंद्र दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. होळी, धुळवडीच्या सणाला अशा घटना घडत असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Satara News
Mohammed Shami : लाज वाटत नाही का, नमाज सोडून रंग उधळतेय? होळी साजरी केल्याने मोहम्मद शमीची लेक ट्रोल

बदलापूरमध्ये ४ जण बुडाले..

धुळवड खेळल्यानंतर काढण्यासाठी उल्हास नदीत उतरलेल्या चार मुलांचा मृत्यू झाला. उल्हास नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे नदीत बुडाले. हे चोघेजण बदलापूरच्या चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे होते अशी माहिती समोर आली आहे.

Satara News
Suresh Dhas : आक्रोश मोर्चाच्या नावाखाली करोडोंची लूट; आमदार सुरेश धस यांची कबुली, म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com