सातारा: नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कराड ,पाटण आणि शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त बाधित 700 कुटुंबाना 5000 पत्र्यांचे वाटप नाम फाउंडेशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे आणि निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाठार येथे करण्यात आले. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या तडाख्याने या परिसरातील अनेक गोरगरीबांना मोठा फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत या कुटुंबांचे संसार पुन्हा उभे राहण्यासाठी मदतीचा हात म्हणून नाम फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.
तीन तालुक्यातील सुमारे 700 गरजू कुटुंबांना हा एक मोठा दिलासा ठरला आहे. अशा नैसर्गिक आपत्तीत संकटात सापडलेल्या गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी नाम नेहमीच पुढे येईल. मात्र त्याचबरोबर आपण सर्वांनी मिळून याकामी पुढाकार घेणे हीच आपली खरी संस्कृती असल्याचं अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी यावेळी म्हटलं आहे. याकामी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही मकरंद अनासपुरे यांनी केले.
दरम्यान, या अगोदरही पुणे जिल्ह्यातील (Pune District) बहुली गावात आगीत जळालेली घरं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून बांधून देण्यात आली होती. संबंधीत लोकांना मदत नाहीतर आधार दिला आहे, असे मत नाम फाउंडेशनचे संस्थापक आणि अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं होतं. नाम फाउंडेशनची स्थापना ही आधार देण्यासाठी झाली आहे असेही नाना पाटेकर त्यावेळी म्हणाले होते. १६ कुटुंबाची घरं जळाली होती, फक्त ती म्हणजे बांधून दिली यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली असल्याचंही नानांनी सांगितले होते.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.