मलकापूरात टाेळक्याने विश्वास येडगेला भाेसकले

पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
crime News
crime News

क-हाड : छाेट्या मुलांमधील भांडणातून एका टाेळक्याने आज (बुधवार) मलकापूर फाटा येथे एका युवकास शस्त्राने भाेसकले. या घटनेची खबर मिळताच पाेलिस घटनास्थळी पाेहचले. टाेळक्याने मारलेल्या युवकास (youth) रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

टाेळक्याने मारलेल्या युवकाचे नाव विश्वास येडगे असे आहे. ताे मलकापूर येथे वास्तव्यास आहे. त्याच्या पोटावर वार झाल्याने ताे गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

crime News
मै हूँ ना! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काेहलीचा खेळण्याचा निर्धार

दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या येडगेला पाहून परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. या हल्ल्याची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील घटनास्थळी आले हाेते. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com