Munawale Tourism: मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Cm Eknath Shinde: मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Cm Eknath Shinde
Cm Eknath ShindeSaam Tv
Published On

Cm Eknath Shinde On Munawale Tourism:

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुनावळे पर्यटन स्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुर्षोत्तम जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cm Eknath Shinde
Maratha Reservation: कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी समिती गठीत, जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विशेष कक्ष’ स्थापन

स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्थानिकांनी ही सुरू होत असलेल्या या पर्यटन स्थळाचा आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा. हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्या मध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून स्थानिकांना त्यांच्या घरा जवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणारे पर्यटक यांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यांसारख्या पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. तसेच यामध्ये सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम या सोयी ही असणार आहेत.

Cm Eknath Shinde
WRD Recruitment News: महाराष्ट्र जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 1 लाख रुपयांपेक्षा जास्त, असा करा अर्ज

ग्रामस्थांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मासेमारीसाठी परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com