यवतमाळ : घरकुलाच्या यादीतून नावं वगळल्याचा राग मनात धरून वंचित लाभार्थ्यासह 17 गावातील सरपंचांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या District Rural Development Agency (डीआरडीए) कार्यालयात तोडफोड केली आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रकल्प संचालकांची खुर्ची उचलून बाहेर आणली होती. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अवधूत वाडी पोलिस ठाण्यात Avadhut Wadi Police Station तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (Sarpanch vandalizes DRDA office)
जिल्ह्यात सन 2019 मध्ये घरकुल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर अनेक लाभार्थ्यांचे नावे वगळण्यात आली होती. तर काही लाभार्थ्यांना वेगवेगळ्या कारणामुळे वगळले होते. त्यावेळी ग्रामपंचायत मध्ये आक्षेप नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यानंतर अनेक लोकांनी आक्षेप नोंदविले होते.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.