नागपूरमध्ये 'संकल्पदिन' साजरा

नागपूरच्या सक्करदारा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन 2024 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प केला.
नागपूरमध्ये 'संकल्पदिन' साजरा

नागपूरमध्ये 'संकल्पदिन' साजरा

मंगेश मोहिते 

Published On

मंगेश मोहिते

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आज काँग्रेस कार्यकर्ते संकल्प दिन म्हणून साजरा करत आहे. नागपूरच्या सक्करदारा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन 2024 मध्ये देशात काँग्रेस ची सरकार आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प केला. यावेळी वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले. Sankalpadin celebrated in Nagpur

हे देखील पहा -

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सिलेंडरला लावलेल्या फोटोला हार घालून वाढत्या महागाईचा निषेध नोंदविण्यात आला. खाण्याचे तेल, सिलेंडर, इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला घर चालविणे देखील कठीण झाले आहे. असे मत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

<div class="paragraphs"><p>नागपूरमध्ये 'संकल्पदिन' साजरा</p></div>
काँग्रेस हा यूपीएचा आत्मा; राहुल गांधीच पंतप्रधान बनणार - नाना पटोले 

काँग्रेसच्या काळात महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी आज गप्प का बसल्या आहे असा सवाल देखील कार्यकर्त्यांनी विचारला. सोबतच महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत चुलीवर मसाले भात शिजवून तो गरीब लोकांना वितरीत वाटप केला. गॅस सिलिंडरच्या किंमती प्रचंड वाढल्या असून त्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

त्यामुळे आता ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे असे महिला काँग्रेसच्या कार्यकत्यांनी सांगितले. महागाई कमी करायची असेल तर देशात काँग्रेसचे सरकार येणे आवश्यक असून त्याचाच संकल्प आज करणार असल्याचे काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com