Sanjay Raut : काय सांगता? पुतीन, बायडेन, चार्ल्स यांच्या तोंडी उद्धव ठाकरेंचीच चर्चा?; राऊतांचा 'तो' VIDEO व्हायरल

संजय राऊतांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Uddhav Thackeray, Putin, Biden Charles discussing
Uddhav Thackeray, Putin, Biden Charles discussingSaam TV

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमी आपल्या रोखठोक वक्तव्याने चर्चेत असतात. संजय राऊत कायमच शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर टीका करत असतात. सध्या संजय राऊत आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध सुरू आहे. अशातच संजय राऊतांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray, Putin, Biden Charles discussing
Sanjay Raut : शिंदे गट शिवसेना भवनावरही आला तर.., संजय राऊत कडाडले!

व्हिडीओत काय आहे?

राऊतांचा हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. ज्यामध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्या तोंडी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच चर्चा सुरू असल्याचं सांगत आहे. संजय राऊत म्हणतात, या तिघांनीही सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. यामध्ये त्यांनी विचारलं की उद्धव ठाकरे कोण आहेत?

'या माणसाची कमाल आहे हा माणूस हार मानत नाही. उद्या तर आमच्यावर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तर आम्हाला उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यावा लागेल. इतकंच नाही तर जो बायडेन यांनी पुतीन यांना विचारलं की मोदींजी को पूछो की ये उद्धव ठाकरे कोण आहेत? आपने हमको अबतक मिलाया कैसे नही', असं संजय राऊत सांगताना दिसत आहे.

Uddhav Thackeray, Putin, Biden Charles discussing
Ajit Pawar News: मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय; अजित पवार असं का म्हणाले?

वास्ताविक, संजय राऊतांनी हे मजेशीर विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाची खिल्ली उडवताना केलं होतं. नागपूरात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते, की 'बिल क्लिंटन यांच्यासोबत राहणारा एक भारतीय काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे आला होता. त्यांनी मला सांगितले, की बिल क्लिंटन यांनी त्यांना विचारले की एकनाथ शिंदे कोण आहेत? बिल क्लिंटन यांनी त्यांना विचारले की एकनाथ शिंदे किती काम करतात, कधी खातात, कधी झोपतात?'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या विधानाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. या विधानाची खिल्ली उडवताना संजय राऊत यांनी पुतीन, बायडेन आणि चार्ल्स यांच्या तोंडी उद्धव ठाकरेंचीच चर्चा सुरू असल्याचा मिश्किल टोला शिंदेंना लगावला होता.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com