Sanjay Raut News : कोण देशपांडे? सवाल करत संजय राऊतांकडून संदीप देशपांडेंच्या पत्राला एका वाक्यात उत्तर

Sanjay Raut Replies to Sandeep Deshpande: संदीप देशपांडे यांनी पत्रातून केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे.
Sanjay Raut And Sandeep Deshpande
Sanjay Raut And Sandeep DeshpandeSaam Tv

तबरेज शेख

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना बिनबुडाचे आरोप म्हणत पत्र लिहून डिवचलं होतं. संदीप देशपांडे यांनी पत्रातून केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे. कोण देशपांडे ? असा सवाल करत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut And Sandeep Deshpande
Sharad Pawar : 'सत्ता केंद्रीत असते, तेव्हा...''चिंचवड पोटनिवडणुकीच्या हायटेक प्रचारात शरद पवारांचा भाजपला टोला

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांला उत्तर दिले. तसेच संदीप देशपांडे यांच्या पत्रातील मजकूरालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

'कोण देशपांडे? आहे का कोणी आणि त्यांचा असा पक्ष असा पक्ष अस्तित्वात आहे का? असा सवाल करत संजय राऊत यांनी संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना प्रत्यु्तर दिलं. 'हमला करो, गोली मारो फिर भी हम शिवसेना मे रहेंगे, असेही प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांना दिलं.

Sanjay Raut And Sandeep Deshpande
Sanjay Raut News: '…नाहीतर रस्त्यावर ‘पवार…पवार’ ओरडत फिरण्याची वेळ येईल'; संदीप देशपांडेंनी पत्र लिहून राऊतांना डिवचलं

संजय राऊत पुढे राजा ठाकूरच्या प्रश्नावर भाष्य करताना म्हणाले, ' मी गुंडावर बोलत नाही. ते पोलिसांचे काम आहे. गुंड, जन्मठेप ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्यावर बोलणार नाही'. तर पुढे शिवसेनेवर म्हणाले, शिंदे गट-मिंधे गट वेगळे झाले आहे. निवडणूक आयागाने त्यांच्या मेहेरबानी केली आहे. बाळासाहेब ठाकरे गद्दारांना आशीर्वाद देईल का, जी मूळ शिवसेना आहे, ती आमच्यासोबत आहे'.

'मी त्यांचा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) कडवा विरोधक आहे. मी मुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरला नाही. केंदीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्या नेत्याबद्दल अपशब्द वापरला, त्याच भाषेत मी उत्तर दिले', असे संजय राऊत पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com