Sanjay Raut: 'अपयशी, अकार्यक्षम गृहमंत्री; देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या...' संजय राऊत कडाडले

Sanjay Raut On Abhishek Ghosalkar Death: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करुन खून करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर विरोधक आक्रमक झाले असून गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
Devendra Fadnavis | Sanjay Raut
Devendra Fadnavis | Sanjay Raut SaamTvNews
Published On

गिरीश कांबळे, मुंबई|ता. ९ फेब्रुवारी २०२४

Sanjay Raut Press Conference:

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करुन खून करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर विरोधक आक्रमक झाले असून गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रात गुंडाराज पाहायला मिळत आहे. मंत्रालयात गुंड भेटायला येत आहेत. बाळराजांना गुंड भेटायला येतात. राज्यात गुंडांना कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहेत. 8 हजार कोटींची ऍम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळालं? त्यामध्ये किती माफिया आहेत? मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे बॅनर कोण लावतं बघा?" असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.

मुख्यमंत्र्यांची चौकशी का नाही?

कल्याणला गणपत गायकवाडने (Ganpat Gaikwad) गोळीबार केला. त्यात एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंचे नाव आले. एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) चौकशी झाली पाहिजे होती. दुसरं कोणी असतं तर त्याची चौकशी केली असती. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची तयारी सुरू आहे. पण महाराष्ट्रात गुंडाना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री यांना जाब विचारला जात नाहीय, अशी टीकाही संजय राऊत यांनी केले.

Devendra Fadnavis | Sanjay Raut
Buldhana News: सिंदखेडराजा ते शेगाव मार्ग लवकरच समृद्धी महामार्गाला जोडला जाणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

फडणवीसांनी राजीनामा द्यावा..

"काल अभिषेक घोसाळकरांची निर्घृण हत्या झाली आहे. ह्यात महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र गृहमंत्री चाय पे चर्चा करत आहेत. पण ह्या प्रकारांवर चाय पे चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम, अपयशी गृहमंत्री ठरलेत, त्यांनी राजीनामा द्यावा, " असेही संजय राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis | Sanjay Raut
Nanded News: भरधाव कार पुलावरून खाली कोसळली; भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com