सुशील थोरात
Sanjay Raut News: संजय राऊत सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी राज्यकर्त्यांवर चौफेर हल्लाबोल केला. 'वृत्तपत्र, चॅनल हे राज्यकर्ते चालवत आहेत. डोक शांत ठेवायचे असेल तर टीव्ही बंद करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मराठी पत्रकार परिषेदेच्या कार्यक्रमास आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आजच्या पत्रकारितेवर जोरदार हल्ला चढवला.
'देशात सध्या नागरी स्वतंत्र हल्ला होत आहे. लोकशाहीवर हल्ला होत आहे. संसदेला ग्रहण लागलेले आहे. ज्यांनी बोलायला पाहिजे, त्या देशाच्या परिस्थितीवर त्यांच्या तोंडाला टाळे लागलेले आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य राहिलेले नाही, असे संजय राऊत म्हणाले.
'100% वृत्तपत्र आणि मीडिया सत्ताधारी पक्षाच्या मालकीचा झाला आहे. जवळजवळ अनेक वृत्तपत्रांचे मालक हे स्वतःचे संसदेचे सभासद झालेले आहेत. ते काय अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आणि कोण उठवू देणार? असा सवाल त्यांनी केला आहे.
'या देशातील न्यायालये जनतेसाठी राहिलेले नाही न्यायालयात न्याय मिळनार का नाही याची खात्री राहिली नाही. जर डोकं शांत ठेवायचे असेल तर टीव्हीच्या बातम्या पाहायच्या बंद करा, मला टीव्हीवर राग नाही, पण मी ज्या गोष्टींमध्ये घडलो आहे, ती पत्रकारिता आता नाही, असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले.
'सरकारवर कोणी बोललं की त्याला कट करून जेलमध्ये टाकलं जातं, मात्र असा आवाज बंद होत नाही, आजकाल वृत्तपत्राचे संपादक राजकीय नेते नेमतात. टीव्ही चॅनलचे हेड सुद्धा सरकारी पक्षाचे नेते नेमतात. मग पुढे ते त्यांचे कर्मचारी नेमतात, अशा पत्रकारितेच्या विरुद्ध आम्ही आहोत, असेही खा संजय राऊत यांनी स्पष्ट केलं
'राज्यकर्ते डरपोक असतात हुकूमशाह डरपोक असतात. त्यांच्या विरोधात आपण जायला पाहिजे. पत्रकारिता यासाठी आपण जपली गेली पाहिजे. वृत्त पत्राची ताकत कळू दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.