नागपूर : भाजपच्या पोलखोल रथाच्या यात्रेवर किती देखील हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी केले आहे. पोलिसांनी जर संरक्षण दिले नाही, तर त्यांची देखील पोलखोल करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. दरम्यान, अमरावती (Amravati) जिल्ह्यात इंग्रजांच्या राज्यासारखे पोलिसांचे राज्य आहे. याठिकाणी हिंदू समाजाला टार्गेट करत असल्याचे प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी (police) जात, धर्म न बघता कारवाई करावी असे देखील फडणवीस यांनी यावेळी म्हणाले आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नागपूर दौऱ्याविषयी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.
हे देखील पहा-
यावेळी फडणवीस म्हणाले की, संजय राऊत सतत नागपूरला आल्यामुळे त्यांना सुबुद्धी येणार आहे, असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला आहे. नागपुरच्या (Nagpur) मातीमध्ये, वातावरणामध्ये एक वेगळेपण असल्याचे ते यावेळी सांगितले आहे. पोलखोल आम्ही रोज करत आहे. ज्यांची रोज पोलखोल होत आहे, ते अस्वस्थ होऊन आमच्या रथावर हल्ले करत आहेत. किती देखील हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. अमरावतीत इंग्रजांचे राज्य चालायचे तसे पोलिसांचे राज्य चाले आहे. त्या ठिकाणी सरकारी मंत्री करत आहेत.
यातून परिस्थिती आणखी वाईट होत आहे. यामुळे दोन समाज एकमेकांपुढे उभे ठाकत आहेत. यामुळे आज जी परिस्थिती आहे. तिथे हिंदू समाजाला टार्गेट करण्याचे काम सुरु आहे, म्हणून तणाव वाढत आहे. पोलिसांनी हे थाबंवावे असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचे काय कारण आहे. हे समजलं पाहिजे. प्रशासकीय चुक झाली, की पाठीमागच्या वेळेस १० डिपींचे बदली आदेश थांबवले. नंतरच्या बदली घोटाळा सीबीआयच्या स्कॅनरमध्ये आहे. बदली घोटाळ्यात ते आले आहे. आता देखील तसाच काहीसा प्रकार आहे का? हे समजलं पाहिजे असे फडणवीस म्हणाले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या बरोबर होते. तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते. गुदगुल्या होत होते. आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले, तर त्यांना खाजवायला होतं आहे. राज ठाकरे यांचा घाव वर्मी लागत असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. भारतीय जनता पार्टीला कोणाला देखील समोर करायची गरज नाही असे ते म्हणाले. आम्ही दररोज पोलखोल करत आहे, यामुळे सरकार आणि सरकारमधील पक्ष व्यथित झाले आहेत. त्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत. पण आम्ही घाबरणार नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.