संदिप भोसले
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज ७ वा दिवस आहे. दरम्यान त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाबाबत मागण्यांच्या समर्थनात आज लातूरच्या जळकोट येथे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना मराठा समाजातील तरुणांनी घेराव घातला. तसेच मागणी मान्य करण्याच्या घोषणा केल्या.
बनसोडे यांना मराठा समाजातील तरुणांनी घेराव घालत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील दिल्या आहेत. तर यावेळी शासनाने तात्काळ सगे-सोयरे यांचा अध्यादेश काढून आरक्षणाची अंमलबजावणी करावी. या मागण्यांचं निवेदन मंत्री संजय बनसोडे यांना दिलं आहे.
मनोज जरांगेंची प्रकृती ढासळताच मराठा समाज आक्रमक
मनोज जरांगेच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झालाय. मराठा बांधवांकडून राज्यभरात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्था देखील कोलमडलीये.
काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महामंडळाने अनेक जिल्ह्यातील एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत बससेवा बंद राहील, असं महामंडळाकडून सांगण्यात आलंय.
हिंगोलीच्या वसमतमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान महामंडळाची बस पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली ते नांदेड राज्य महामार्गावरील खांडेगाव पाटी जवळ अज्ञात आंदोलकांनी ही बस पेटवली. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.