Gopichand Padalkar: 'दुष्काळ परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती; जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी', गोपीचंद पडळकर यांची मागणी

Sangli Latest News: जत तालुक्यातील दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
Gopichand Padalkar: 'दुष्काळ परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती; जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी', गोपीचंद पडळकर यांची मागणी
Gopichand PadalkarSaam tv
Published On

सांगली, ता. 2 जून २०२४

सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. याप्रकरणी कारवाईची मागणी करत जत तालुक्यातील दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने चारा डेपो किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या गोपीचंद पडळकर यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. जत तालुक्यातल्या पूर्व भागातील अनेक दुष्काळी गावांना भेट देऊन दुष्काळग्रस्तांशी पडळकर यांच्याकडून संवाद साधण्यात आला आहे.

Gopichand Padalkar: 'दुष्काळ परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती; जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी', गोपीचंद पडळकर यांची मागणी
Ahmednagar News: पोटदुखीचा बहाणा, रुग्णालयात नेताना केला पोबारा, सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी जेलमधून फरार; नगरमध्ये खळबळ

जयंत पाटलांवर निशाणा..

दरम्यान, राज्याचे अडीच वर्षे जलसंपदा मंत्री व सांगलीचे पालकमंत्री असताना जयंत पाटलांनी जत तालुक्यातल्या म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेसाठी एक रुपया देखील निधी दिला नाही, असा आरोप करत महायुतीकडून मात्र दोन हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला,असे देखील गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

Gopichand Padalkar: 'दुष्काळ परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती; जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी', गोपीचंद पडळकर यांची मागणी
Arvind Kejriwal News: 'सुप्रीम कोर्टाचे आभार, दिल्लीच्या जनतेला भावुक संदेश...' CM अरविंद केजरीवाल पुन्हा तिहार जेलमध्ये जाणार!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com