Sangli Police : एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी तिघांना अटक; पैसे पुरवणाऱ्यासह सप्लाय करणाऱ्यांचा समावेश

Sangli News : विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीजमध्ये हा एमडी ड्रग्स बनवण्याचा उद्योग सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची माहिती मिळाल्यावरछापा टाकत एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला
Sangli Police
Sangli PoliceSaam tv
Published On

सांगली : सांगली पोलिसांनी विटा येथे कारवाई करत एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्याची कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल २९ कोटी ७५ लाखांचा एमडी ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणी सांगली पोलिसांनी विट्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ड्रग्ज कारखान्यासाठी पैसे पुरवणारा, ड्रग्ज बनवणारा आणि ड्रग्ज सप्लाय करणारा अशा तिघांचा यामध्ये समावेश आहे. 

सांगली पोलिसांनी २८ जानेवारीला विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीजमध्ये हा एमडी ड्रग्स बनवण्याचा उद्योग सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची माहिती मिळाल्यावरछापा टाकत एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला. यात तब्बल पावणेतीस कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करत तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई आणि गुजरात कनेक्शन समोर आले असून याचा तपास सुरु आहे.

Sangli Police
Pen Ashram School : पेण आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्‍यू; मुख्याध्यापक, अधीक्षकास नोटीस

तिघांची वेगवेगळी कामे 

दरम्यान सांगली पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेतले आहे. यात एक रायगड जिल्ह्यातल्या अलिबागचा तर दुसरा मुंबई आणि तिसरा सांगलीच्या वाळव्यातला असून जितेंद्र परमार, सरदार पाटील आणि अब्दुल रज्जाक शेख अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. जितेंद्र परमार हा अलिबागचा असून त्याने ड्रग्ज कारखान्यातील मशनरीसाठी आर्थिक मदत केली आहे. तर सांगलीच्या वाळव्यातल्या सरदार पाटील हा ड्रग्ज बनवण्याचे काम करत होता. तर मुंबईचा असणारा अब्दुल रजाक शेख हा ड्रग्ज सप्लाय करण्याचं काम करत होता. 

Sangli Police
Cyber crime : अँप डाउनलोड करताच बँक खाते रिकामे; तरुणाची ७ लाख ३० हजार रुपयात फसवणूक

पोलिसांकडून अधिक तपास सुरु 

काही दिवसांपूर्वी सांगलीच्या विटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका कारखान्यावर छापा टाकत तीस कोटींचा जप्त करत तिघांना अटक केली होती. यानंतर आत तीन जण ताब्यात घेतले असून प्राथमिक तपासामध्ये सहा जणांची साखळी असल्याचे निष्पन्न झाले असून गुजरातच्या वापीमधून ड्रग्ज बनवण्याचा कच्चामाल मागवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आणखी कुणाचा आणि कोठे कनेक्शन आहे. याचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com