Sangli News: ५४ लाख तांदळातून साकारली शिवरायांची भव्य दिव्य प्रतिकृती

५४ लाख तांदळातून साकारली शिवरायांची भव्य दिव्य प्रतिकृती
Sangli News Shivaji Maharaj
Sangli News Shivaji MaharajSaam tv

सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अमरापूर या विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची तांदळाच्या माध्यमातून भव्‍य दिव्‍य प्रतिकृती साकारली आहे. विद्यालयातील कलाशिक्षक नरेश लोहार यांच्या (Sangli News) संकल्पनेतून तब्बल ५४ लाख तांदळातून भव्य दिव्य प्रतिकृती साकारली आहे. (Letest Marathi News)

Sangli News Shivaji Maharaj
Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हेंचा CM शिंदेंना अल्टिमेट...; पुढील वर्षी शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा न दिसल्यास उचणार मोठं पाऊल

कलाशिक्षक नरेश लोहार यांच्या समवेत विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी मेहनत घेत १७ बाय २५ फुट या साइजमधे ही प्रतिकृती अवघ्या २ दिवसात १९ तासात पूर्ण केली आहे. तांदळाला अक्रालिक रंगाच्या माध्यमातून विविध रंगछटा देण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना बालवयातच मिळाली पाहिजे. स्वतःच्या कुटुंबाला विसरून मायेने हात फिरावणारे व स्वराज्य मिळवण्यासाठी धडपडणारे ते छत्रपती शिवाजी महाराज होते. याच प्रेरणेतून शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा व प्रत्येक विद्यार्थ्यानी एक उत्तम कला जोपासवी अशी भावना व्यक्त करत ही प्रतिकृती साकारली.

दुसरा अनोखा उपक्रम

कलाशिक्षक नरेश लोहार यांनी ६ डिसेंबर २०२२ रोजी साडेतीन हजार चौरस फुट या आकारांत ३ हजार २२१ वह्या पुस्तकांमधुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील पहिली प्रतिकृती साकारताना अनोखे अभिवादन देण्यात आले होते. या दुसऱ्या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत असून विद्यार्थी व पालकांसाठी ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com