गारांसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; गावातील यात्रेत पाणीच पाणी

गारांसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; गावातील यात्रेत पाणीच पाणी
Rain
RainSaam tv

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर पूर्व भागात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारांचा आणि विजेच्या कडकदासह पाऊस झाला. तर ऐन यात्रेच्या तोंडावर लेंगरे येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस (Rain) झाल्‍यामुळे यात्रेसाठी आलेल्या पालातील छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावात पाणी शिरल्याने यात्रेसाठी उत्साहात असलेल्या ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे. (sangli news khanapur aria Heavy presence of unseasonal rain with hail)

Rain
सांगलीत पोलीस हवालदाराची आत्महत्या

तालुक्यातील प्रमुख यात्रांपैकी एक (Sangli News) असलेल्या लेंगरे येथील पिर कलंदर बाबांचा ऊरूस आजपासून सुरू झाला आहे. शुक्रवारी संदलची रात्र आहे. दोन वर्षाच्या खंडीत कालावधीनंतर यात्रा होणार असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यात उत्साहाचे वातावरण होते. ऊरूसासाठी गावात मोठ्या प्रमाणावर खेळणे, पाळणे आणि मिठाई, विविध वस्तूंचे स्टॉल आले आहेत. मात्र यात्रा सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरूवात झाली.

काही किरकोळ जखमी

वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामध्ये खेळणे, पाळणे आणि विविध स्टॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्टॉलमधील काही लोक वाऱ्याने पाल पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. गावातील रस्त्यावर गुडघाभर पाणी वहात होते. बाजारपेठेसह यात्रेसाठी पाले लावलेल्या मैदानावरही पाण्याचा खच साचल्याने छोट्या व्यापाऱ्यांचे, हातावर पोट असणाऱ्या स्टॉल धारकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. भिजत्या पावसात डोळ्यातील अश्रू लपवित पुन्हा नव्याने पाले उभारणे देखील त्यांच्यासाठी मुश्किलीचे झाले आहे. ऐन यात्रेत आलेल्या गारांच्या पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने दोन वर्षांच्या खंडीत कालावधीनंतर उत्साही असणाऱ्या लेंगरेकरांच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com