

सांगली : सांगलीतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील रामपूरमध्ये एका प्रेयुगालाने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान दोन्ही घटनेबाबत घातपात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
सांगलीच्या (Sangli) रामपूर गावातल्या कोळेकर वस्ती या ठिकाणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. उमेश अशोक कोळेकर आणि प्रियंका बाळासाहेब कोळेकर असं दोन्ही मृतांचं नाव आहे. तर प्रियंका या विवाहित होत्या.
गावातल्या कोळेकर वस्तीवरील शेता नजीक असणाऱ्या ओढ्या जवळ उमेश कोळेकर यांचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच शेजारी विषारी औषधाची बाटली देखील सापडली आहे. दुसरीकडे प्रियंका बाळासाहेब कोळेकर या विवाहित महिलेने राहत्या घरात आत्महत्या केली.
सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताचंजत पोलिसांनी (Police) घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला आहे.
दरम्यान मृत विवाहित महिला ही घटनेच्या आधी मृत महिला प्रियांका कोळेकर हिने जत पोलीस ठाण्यामध्ये मृत उमेश कोळकर यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या सर्व घटनेनंतर या दोघांच्याही आत्महत्येचा प्रकार घडला आहे.
तर मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होईल,अशी माहिती जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांनी दिली आहे. दरम्यान, दोघांच्या आत्महत्येने दोघेही राहत असलेल्या परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दोघांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.