बागेत घडत होतं भयंकर काहीतरी; धाड टाकणाऱ्या पोलिसांनाही दृश्य बघून बसला हादरा

डाळिंबाच्या बागेत 'गांजा'ची लागवड, पोलिसांच्या छाप्यात लाखोंचा गांजा जप्त; आरोपी फरार
Sangli Crime News
Sangli Crime Newsविजय पाटील

सांगली : सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातील माणिकनाळ येथे डाळिंब बागेत गांजा लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून १३३ किलो वजनाचा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत जवळपास १३ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी महासिध्द बगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बगली सध्या फरार आहे.

जत (Jat) कर्नाटक सीमावर्ती भागातील माणिकनाळ येथे डाळिंबाच्या बागेत बगली यांनी बेकायदेशीर गांजा लागवड केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी माहिती मिळाली होती. याबाबत पवार यांनी पोलीस (Police) उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली डाळींबाच्या शेतात छापा टाकला.

पाहा व्हिडीओ -

छापा टाकला या वेळी डाळींब बागेत (Pomegranate) गांजाची ५ ते ७ फुट उंचीची झाडे शेतातून बाहेर काढली. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन १३३ किलो झाले असून सद्यस्थितीत बाजार भावाप्रमाणे या गांजाची किंमत १३ लाख ४० हजार रुपये इतकी होते.

दरम्यान, सदर आरोपी फरार असून त्यांचा शोध उमदी पोलीस करत आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी करजगी येथे उसाच्या शेतात केलेला सुमारे दीड कोटीचा गांजाची झाडे जप्त केली होती ही झाडे अक्षरशा दोन ट्रॅक्टर मधून आणली होती.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com