Sangli News
Sangli NewsSaam Digital

Sangli News : लग्न समारंभाला जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; जत मार्गावर भीषण अपघातात ५ ठार

Sangli Accident : तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे.जत मार्गावर नागज जवळील जांभूळवाडी हद्दीत क्रूझर आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला.

तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे.जत मार्गावर नागज जवळील जांभूळवाडी हद्दीत क्रूझर आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमीना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे लग्न सोहळयासाठी क्रूझरधून १४-१५ जण निघाले होते. दरम्यान जत मार्गावर नागज जवळील जांभूळवाडी हद्दीत क्रूझरने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला मागून धडक दिली. धडक इतकी जोराची होती की ५ जण जागीच ठार झाले तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांना सांगली मधील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.

Sangli News
Kolhapur News : कोल्हापुरात घडली नात्याला काळीमा फासणारी घटना; जन्मदात्या आईनेचं विकलं मुलीला

हळदीच्या कार्यक्रमाला जाणारी जीप पलटली; ४ जण ठार

हळदीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाने घाला घातलाय. खामगाव जालना महामार्गावर जीप पलटून ४ प्रवाशांचा मृत्यू झालाय तर ५ जण जखमी झालेत. चिखली तालुक्यातील अंबाशी येथील देशमुख कुटुंबीय जालना येथे हळदीच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी हा अपघात घडलाय.

Sangli News
Unseasonal Rain Update: सातार- सांगली-कोल्हापूरला अवकाळीचा फटका, वीज पुरवठा खंडीत झाल्याने जनजीवन विस्कळीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com