संभाजी भिडेंच्या उपस्थितीत श्री दुर्गामाता दौडची सांगता

sambhaji bhide
sambhaji bhide

सांगली : काेविड १९ च्या पार्श्वभूमीवर नवरात्राेत्सवानिमित्त सांगलीतील श्री दुर्गामाता दौड साध्या काढण्यात आली. सांगली येथील दुर्गा माता मंदिरात ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणून आरती करून सर्व धारकरी घरी गेले. यावेळी उपस्थितांना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मार्गदर्शन केले. sangli-navratri-festival-sambhaji-bhide-durgamata-daud-sml80

sambhaji bhide
देव काेणी पाण्यात ठेवले माहित नाही; उदयनराजे तुमच्यासमाेर उभा आहे

नवरात्राेत्सव सार्वत्रीकरित्या साजरा करण्यासाठी दुर्गामाता दाैडची शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) sambhaji bhide यांनी ही संकल्पना पुढे आणली. युवका वर्गात हिंदू धर्माविषयी जागुर्ती निर्माण करणे याबराेबरच युवकांचे संघटन करणे या हेतुने सन १९८३ पासून भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गामाता दौड सुरु केली.

नवरात्रोत्सवाचे वातावरण आणि दुर्गामात दौड हे आता एक समीकरण झाले आहे. या निमित्ताने शहरात एकी निर्माण हाेते. दाैडच्या आयाेजनासाठी काही दिवस आधी वातावरण निर्मिती केली जाते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून पहाटे दौडीस प्रारंभ केला जाताे. मशाल, तलवारधारक, ध्वजधारक दौडीच्या अग्रस्थानी असतात. ठिक ठिकाणी घरासमोर रांगोळी काढून, आणि आैक्षण करून दौडीचे पजून केले जाते. ठिक ठिकाणी फटाके फाेडून देखील स्वागत करण्यात येते. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौड रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने दाैडचे पूजन केले गेले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com