सांगली : पूर येणे काही राजकीय विषय नाही राजकारणाचा संबंध नाही. मानवाला शक्य होईल तेवढे काम करणे गरजेचे आहे. माणसानेच अतिक्रमण केले आहे. निसर्गाशी आपण फार मोठा खेळ केला आहे. अनेक मशिनरी आल्या, अतिक्रमण केले तेव्हा पासून निसर्गपुढं गेला आहे. त्यामुळे सांगली शहरात बिबट्या, मगरी येऊ लागल्या आहेत. फार गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मानवाच्या अनेक चुका झाल्या आहेत. याचे दूरगामी परिणाम सोसावे लागणार आहेत असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले.
येथील पृथ्वीराज फॉउडेंशनच्या वतीने सांगलीत पूर परिषद आयाेजित करण्यात आली. त्यामध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील, कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम sangli flood discussion program jayant patil and vishwajeet kadam यांनी आपले मते मांडली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले व्यवस्थेच्या पुढं अशक्य असा पाऊस पडला तर काेणीच काहीच करू शकत नाही. यंदाच्या पावसामुळे काेणताच ताळमेळ साधू शकलाे नाही. गतवेळच्या पूर परिस्थितीचा अभ्यास करुनच उपाययाेजना केल्या हाेत्या. परंतु २४ तासांत साडे साेळा टीएमसी पाऊस झाल्याने निसर्गाच्या राैद्रावतारापुढं काेणाचेच काही चालले नाही.
यंदा मात्र आपण संकटाची चाहूल लागताच अनेकांना गांव सोडायला लावले. त्यामुळे यावेळी माेठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली नाही. गतवेळी जिवंत जनावर वाहून गेली. त्यावेळी डोळ्यात पाणी आले होते असे भावविवश हाेऊन जयंत पाटील यांनी नमूद केले.
दरम्यान कोल्हापूरच्या पंचगंगेच पाणी डायव्हर्ट करणे हा एकच पर्याय आहे. तसेच भीमा नदीचा पण एक पर्याय आहे. उद्या नऊशे मिलिमीटर पाऊस पडला तर काय करायचं. ही एक शर्यत आहे मानवाची पावसाबरोबर असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.
ज्या ठिकाणाहून पाणी सांगली शहरात पाणी शिरते त्या ठिकाणी भिंत बांधणे शक्य आहे का? या प्रश्नावर हा विचार सुरू आहे. कितीही पाऊस आला तरी आपल्या कृष्णा नदीने दिशा बदलली नाही, कृष्णा नदीमुळे आपण जगलो असेही त्यांनी नमूद केले.
कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले परमेश्वरने ठाम भूमिका घेत ही शिक्षा आपल्याला दिली आहे. कारण अनेक पिढ्यानपिढ्या आपण शोषण आणि प्रदूषण केले आहे. अनेक गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळेच बहुधा कोरोना आला आणि आपल्याला घरात बसवले. त्यानंतर पूर आला. या संकटांमुळे आर्थिक भार सर्वाना सोसावा लागत आहे. या सर्वाचा सर्व्हे करून उपाययोजना करण्याची गरज आहे. निसर्गाला आपण कारण देतो. पण त्यातील बारकावे शाेधत नाही. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. सांगली जिल्ह्याला पुराचा तिसऱ्यांदा फटका बसला आहे. आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्या दिशेने पाऊले टाकणे गरजेचे असल्याचे मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.