सरकारने आम्हांला पक्की घरे बांधून द्यावीत; पूरग्रस्तांची मागणी

sangli miraj situation after floods
sangli miraj situation after floods
Published On

सांगली : प्रत्येक वर्षी पाणी येते. दरवेळी घर दुरुस्ती करण्यातच पैसे जातात. घरात सर्वत्र चिखल पसरला आहे. शेती वाहून गेली. काय खायचे हेच समजत नाही. सरकारने आम्हांला पक्की घरे बांधून द्यावीत अशी मागणी मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज गावातील महिला करु लागल्या आहेत. (sangli-digraj-residents-demands-news-house-to-maharashtra-government-sml80)

सांगली जिल्ह्यात महापुरा नंतर आता चिखलाचा महापूर आला आहे. मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्याला पुराचा फटका येथील नागरिकांना बसला आहे. या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात घर सुद्धा पडली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कोटयवधी रुपयाचे नुकसान झाले आहे sangli miraj situation after floods.      

sangli miraj situation after floods
प्रांताधिकारी मनीषा राशिनकरसह काेतवाल ACB च्या जाळ्यात

मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज गावाला दर वर्षी पुराचा फटका बसतो. यंदा ही गावाला पुराचा फटका बसला आहे. गावाला चारी बाजूने पाण्याने वेढले होते. अनेक घराची पडझड सुद्धा झाली आहे. ग्रामस्थ पुरामुळे हैराण झाले आहेत. दुसरीकडे पूर ओसरू लागला आहे. ग्रामस्थ पुन्हा गावाकडची वाट धरत आहेत. मात्र गावात गेल्यावर सर्वत्र चिखलाच साम्राज्य दिसून आले. गुडघ्या एवढ चिखल गावात आणि घरामध्ये साचून राहिल्याने कपाळावर हात मारण्यापलीकडे काहीच करु शकले नाही काेणी.

माेजे डिग्रजमधील महिलांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. प्रत्येक वर्षी पाणी येते. दरवेळी दुरुस्ती करण्यातच पैसे जातात. घरात सर्वत्र चिखल पसरला आहे. शेती वाहून गेली. काय खायचे हेच समजत नाही. सरकारने आम्हांला पक्की घरे बांधून द्यावीत अशी मागणी केली. अन्य भागातील महिलांनी देखील घरात चिखलाचा महापूर झाला आहे. घराचे पत्रे उडून गेलेत. भिंती चिरल्या आहेत. काय काय भरुन नेणार आम्ही. घरे बांधून द्या एवढीच आमची मागणी असल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com