Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, भरधाव कारचा टायर फुटून ट्रकला धडक; चौघे जखमी

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, भरधाव कारचा टायर फुटून ट्रकला धडक; चौघे जखमी

Washim Truck And Car Accident: या अपघातामध्ये कारमधील चौघे जण जखमी झालेत. जखमींवर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Published on

मनोज जैस्वाल, वाशिम

Washim News: समृद्धी महामार्गावर अपघाताची (Samruddhi Highway Accident) मालिका सुरुच आहे. वाशिमजवळ या महामार्गावर पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. कार आणि ट्रकचा भीषण अपघात (Car And Truck Accident) झाला. या अपघातामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमास घडली.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, भरधाव कारचा टायर फुटून ट्रकला धडक; चौघे जखमी
Kannad Crime News: 30 वर्षीय तरुणाचं अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य; बापाला कळताच झाला 'गेम'

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या मालेगाव तालुक्यात रेगाव परिसरात ही घटना घडली. समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा टायर अचानक फुटला. या कारने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील चौघे जण जखमी झालेत. जखमींवर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, भरधाव कारचा टायर फुटून ट्रकला धडक; चौघे जखमी
Nagpur Shocking Video: 29 सेकंदात 19 वार भरदिवसा पेट्रोल पंप मालकाची हत्या; भयानक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

ही कार नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने निघाली होती. याच दरम्यान ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी देखील समुद्री महामार्गावर वाशिमच्या कारंजा तालुक्यात अपघात झाला होता. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला होता. ही कार तुळजापूरवरुन नागपूरकडे जात होती. या अपघातामध्ये सात जण गंभीर जखमी झाले होते.

समृद्धी महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. दोन ट्रकने एकमेकांना धडक दिली. अपघातानंतर दोन्ही ट्रकला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात एक ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालक आणि सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com