Marathwada Heavy Rain : अतिवृष्टीचा फटका; मराठवाड्यात १४१८ कोटी रुपयांचे नुकसान, १९ लाख शेतकरी बाधित

Sambhajinagar News : अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने सोयाबीन उडीद तूर मूग आणि कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे
Marathwada Heavy Rain
Marathwada Heavy RainSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : यंदा जुलै महिन्यापासून सातत्याने पाऊस होत आहे. तर साधारण महिनाभरापासून जोरदार पाऊस होत असल्याने अनेक भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने हजारो गवे बाधित झाले असून १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

मागच्या आठवडाभरापासून मराठवाड्यातल्या सगळ्याच भागात अतिवृष्टी, ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय शेत जमिनी वाहून गेल्या आहेत. अनेक घरांची पडझड झाली. यामुळे मराठवाड्यात १४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून या नुकसानीसाठी पन्नास टक्के म्हणजेच ६३० कोटींची मदत शासनाने १८ सप्टेंबरपर्यंत मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Marathwada Heavy Rain
Kej Crime : केज गटशिक्षणाधिकारी विरोधात विनयभंगाचा गुन्हा; अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

१९ लाख शेतकरी बाधित 

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे आकडे अद्याप स्पष्ट नाहीत. तसेच अद्याप सप्टेंबरमधील नुकसानीचा आकडा समोर आला नाही. सर्वाधिक नुकसान हे सप्टेंबर महिन्यात झाले आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यानुसार किती मदत लागणार, हे स्पष्ट नाही. आतापर्यंत ५ हजार गावांतील १९ लाख शेतकरी बाधित झाले. 

Marathwada Heavy Rain
Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; खेडकर कुटुंबाचा चालकाला अटक, कुटुंबीय अद्याप फरार

मंजूर निधीत ५० टक्के फरक 

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतात जाता येत नाही. तर ई- पीक पाहणी सर्व्हर डाऊन असणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे लोकेशन चुकीचे दिसणे, खाते क्रमांक न जुळणे आदी अडचणींमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करु शकले नाहीत. शासनाकडे केलेली मागणी आणि मंजूर केलेल्या निधीत ५० टक्के फरक सध्या आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात प्रामुख्याने पीक नोंदणी, आधार-बँक खाते लिंक नसणे, पंचनामा प्रक्रियेतील विलंब, नैसर्गिक आपत्तीनंतर मदतीची प्रतीक्षा व निधी वितरणातील समस्या या प्रमुख अडचणी आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com