Sambhajinagar : जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकल्या प्रत्यक्ष ४० तक्रारी, सात तक्रारींचा जागेवरच निकाल; 'जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी' उपक्रम

Sambhajinagar News : नागरिकांना होणारा त्रास थांबावा या दृष्टिकोनातून संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी आपल्या दारी हा नवीन अनोखा उपक्रम सुरू केला
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील नागरिकांना आता आपल्या तक्रारी मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज नाही. करणी 'जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी' हा उपक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केला. आजपासून याचा शुभारंभ झाला असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ४० नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांनी ऐकून घेतल्या. यातील ७ तक्रारी जागेवरच निकाली काढल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाभरातील नागरिक आपल्या विविध समस्यांना घेऊन भेट देत असतात. मात्र, अनेकांची कामे होत नसल्यामुळे वारंवार या ठिकाणी चकरा माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबावा या दृष्टिकोनातून संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी आपल्या दारी हा नवीन अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

Sambhajinagar News
Pune : गोल्फचा चेंडू मैदानाबाहेर, दुचाकीस्वाराला लागला, गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात जाऊन, व्हिडिओ कॉलद्वारे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आपली समस्या सोडवता येईल. हा उपक्रम आठवड्यातील प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी जिल्ह्यातील तहसील कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

Sambhajinagar News
Wardha : हनुमान मंदिरात अस्वलाचा धुमाकुळ; मुर्त्यांची केली तोडफोड, बांबरडा गावात रात्रभर भीतीचे वातावरण

नागरिकांशी थेट संवाद 

नागरिकांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधण्याचाही अनुभव या उपक्रमाच्या माध्यमातून घेतला. नागरिकांनी ग्रामीण भागात स्मशानभूमीची जागा, जमीन मोजणी, अतिक्रमण, सातबारा नोंद, अतिवृष्टीचे अनुदान अप्राप्त, संत सेवालाल बंजारा तांडा सुधार योजना, कुळ कायद्यातील जमीन विक्री बाबतची परवानगी, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वेळेत अनुदान मिळण्याची मागणी, वारसा हक्क प्रमाणपत्र, शिवरस्ता तयार करून मिळणे बाबत या संदर्भातील तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या.  

सात तक्रारींचा निपटारा 

ग्रामिण भागातील नागरिकांना आपल्या तक्रारी, गाऱ्हाणे मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागू नये; यासाठी ‘जिल्हाधिकारी तहसिलचे दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची आज सुरुवात झाली. आज या उपक्रमाद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ४० हून अधिक नागरिकांचे म्हणणे ऐकले. त्यातील ७ जणांच्या तक्रारींवर जागीच निकाल देण्यात आला. आजच्या उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड सहभागी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com