नानाभाऊ राज्याचं सोडा, लातूरात स्वबळावर लढून दाखवा - निलंगेकर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पॅटर्न निर्माण करण्याचे सुतोवाच केले होते.
Sambhaji Patil Nilangekar | Nana Patole
Sambhaji Patil Nilangekar | Nana Patole SaamTvNews
Published On

लातूर : "काँग्रेसकडून सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. राज्यात काँग्रेसकडून (Congress) काय निर्णय होईल तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री अमित देशमुख यांनी किमान लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणुक लढवून दाखवावी" असे, आव्हान माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil-Nilangekar) यांनी दिले.

हे देखील पहा :

लातुर (Latur) जिल्ह्यातील निलंगा (Nilanga) तालुक्यातील कांही भाजपा कार्यकर्त्यांचा शुक्रवारी मुंबई येथे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. त्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पॅटर्न निर्माण करण्याचे सुतोवाच केले होते. एवढेच नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले. पटोले यांच्या भाजप मुक्त पॅटर्न आणि स्वबळाच्या विधानावर आमदार संभाजी पाटील निलंगकेर यांनी पलटवार केला.

Sambhaji Patil Nilangekar | Nana Patole
Gondia : बियर बार चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक!

निलंगेकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षे राजकारणात काम करत असताना व्यक्ती म्हणून सोडून गेल्यानंतर वेदना तर होत असतातच. मात्र, राजकारणात महत्त्वकांक्षा निर्माण झाली की, काही कार्यकर्ते पक्षांतर करत असतात, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण, काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राज्याचे सोडा किमान लातूर जिल्ह्यात तरी स्वतंत्र लढवाव्यात, असे माझे त्यांना आव्हान आहे.

Sambhaji Patil Nilangekar | Nana Patole
अहमदनगर जिल्हा हादरला! विहिरीत आढळले आईसह तीन चिमुकल्यांचे मृतदेह

पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी तरी सुखाने नांदावे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या घरची सासू कडक असून नवऱ्याची भेट होणे मुश्कील होणे अवघड असल्याने संसार कसा थाटणार हे लवकरच जनतेला दिसणार असल्याची मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहीला असून यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार आहे. मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एक चकार शब्दही काढला नाहीत. यावरूनच असे दिसते की, या महाविकास आघाडी सरकारची ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण द्यायची नियत नाही, असेही निलंगेकर म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com