Sakal-Saam Survey: शरद पवार की अजित पवार? कोणाची बाजू योग्य; सर्व्हेत मतदारांची पसंती कुणाला?

Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडात कोणाची बाजू योग्य वाटते? या प्रश्नावर देखील लोकांनी स्पष्टपणे मतं नोंदवली आहेत.
Sakal-Saam Survey
Sakal-Saam Surveysaam tv
Published On

Sakal-Saam Survey: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सकाळ साम माध्यम समुहातर्फे 74 हजार लोकांची मतं जाणून घेण्यात आली. या सर्वे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांसह इतर सर्व पक्षातील मतदारांची देखील मतं जाणून घेण्यात आली.

सकाळ साम सर्व्हेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गटएकत्र सत्तेत यावे असे मानणाऱ्या मानणाऱ्या मतदारांचा कल देखील जाणून घेण्यात आला. फुटीर आमदारांबाबत 41 टक्के लोकांना वाटतंय की आमदारांनी राजीनामा द्यावा. 29 टक्के मतदारांना वाटते की कायमची बंदी घालावी, तर 14 टक्के लोकांनी अजित दादांचा निर्णय मान्य असल्याचे मत नोंदवले आहे. यापैकी काही नाही असे 15 टक्के लोकांनी म्हटलं आहे, तर 1 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत नोंदवले आहे.

Sakal-Saam Survey
Sakal Saam Survey: वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा पायंडा मान्य आहे का? सर्व्हेत मतदारांनी मांडलं रोखठोक मत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडात कोणाची बाजू योग्य वाटते?

शरद पवार यांच्या बाजूने 43.6 सहा टक्के लोकांनी मत नोंदवले आहे, तर 23.8 टक्के लोकांना अजित पवार योग्य आहे असे वाटते. याशिवाय सांगता येत नाही असं म्हणणाऱ्या मतदारांची संख्या 33.3 टक्के आहे. ही संख्या अजित पवार योग्य आहे म्हणणाऱ्यांपेक्षा मोठी आहे. हा मतदार काळानुसार कोणाकडेही जाऊ शकतो. परंतु पवारांच्या बाजू योग्य असल्याचे सध्यातरी बहुसंख्य लोकांना वाटते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडात कुणाची बाजू योग्य वाटते?

शरद पवार - सर्व पक्षातील 43.6 टक्के लोकांना शरद पवार योग्य आहेत असे वाटते, तर फक्त राष्ट्रवादीच्या 61 टक्के लोकांना शरद पवारांची भूमिका योग्य वाटते. याशिवाय भाजपच्या 19 टक्के, काँग्रेसच्या 57 टक्के आणि सेनेच्या 54 टक्के लोकांना शरद पवार योग्य आहेत असे वाटते.

अजित पवार - सर्वपक्षीय लोकांचा विचार केला तर 23.1 टक्के लोकांना अजित पवार योग्य आहेत असे वाटते, तर फक्त राष्ट्रवादीच्या 25 टक्के मतदारांना अजित पवार योग्य आहेत असे वाटते. याशिवाय भाजपच्या सर्वाधिक 41 टक्के, काँग्रेसच्या 13 टक्के आणि शिवसेनेच्या 15 टक्के लोकांना अजित पवार योग्य वाटतात.

सांगता येत नाही - सर्व पक्षातील 33.3 टक्के मतदारांनी सांगता येत नाही असे मत नोंदवले आहे, तर राष्ट्रवादीच्याच 14 टक्के मतदारांनी देखील सांगता येत नाही म्हटले आहे. याशिवाय भाजपच्या 40 टक्के, काँग्रेसच्या 30 टक्के आणि शिवसेनेच्या 31 टक्के मतदारांनी देखील या प्रश्नाचं उत्तर सांगता येत नाही असे दिले आहे.

Sakal-Saam Survey
Pune Guardian Minister: चंद्रकांत पाटील यांच्या हातून पुणे जाणार? अजित पवार होऊ शकतात नवीन पालकमंत्री

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांना सर्वसामान्य मतदारांकडून सहानुभूती मिळेल असं वाटतं का?

या प्रश्नाच्या उत्तरात सर्वाधिक लोकांनी शरद पवार यांना सहानुभूती मिळेल असे म्हटले आहे. या प्रश्नावर 46.5 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं आहे, तर 23.3 टक्के लोकांनी शरद पवारांना सहानुभूती मिळणार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 30.2 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे म्हटले आहे. या लोकांचा कल काळानुसार दोघांकडे झुकू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com