औरंगाबाद सभेवरून राज ठाकरेंवर सचिन खरात यांची जहरी टीका

राज ठाकरे यांचा पक्ष आता संपलेला आहे.
Sachin Kharat
Sachin Kharatविनोद जिरे
Published On

बीड: सर्कशीत खेळ दाखवणाऱ्या विदुषकाला पाहायला जशी गर्दी असते, तशी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला बाहेरून गर्दी होते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद (Aurangabad) सभेवरून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे नेते, सचिन खरात यांनी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते बीडमध्ये (Beed) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे देखील पाहा-

यावेळी सचिन खरात म्हणाले, की राज ठाकरे यांचा पक्ष आता संपलेला आहे. त्यामुळे आता ते हनुमान चालीसा आडून हिंदुत्वाचे राजकारण (Politics) करत आहेत. यामुळे मला एक मला सांगायचंय, की एक सर्कस चाललेली असते, त्यावेळेस सर्कस बघण्यासाठी फार गर्दी असते, त्याचं कारण सर्कसमध्ये विदूषक हा खेळ करत असतो. आणि तो खेळ पाहण्यासाठी गर्दी (crowd) होते. मात्र, सर्कस संपल्यानंतर त्या तंबूमध्ये कोणीच राहत नाही. उद्या सुद्धा औरंगाबादमध्ये बाहेरून येणारी गर्दी मोठी असणार आहे.

मात्र, औरंगाबादची जनता नसणार आहे. कारण औरंगाबाद ही क्रांतिकारी भूमी आहे. पंरतु, बाहेरून लोक गर्दी करतील आणि लगेच तो तंबू रिकामा होईल. जसे त्यांच्या सभेला गर्दी होते, तसे मात्र त्यांना मतदान पडत नाही, असे म्हणत आरपीआयचे खरात गटाचे नेते, सचिन खरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबाद सभेवरून जहरी टीका केली आहे.

Sachin Kharat
देशातील या भागात सर्वाधिक अतिरेक्यांचा खात्मा; MHA अहवालातून समोर

राज ठाकरे हे बहुजन नेत्यांचा विरोध करतात आणि फक्त विशिष्ट नेत्यांचे नाव घेतात. आजपर्यंत त्यांनी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांचे दर्शन घेतले नाही. मला एक त्यांना सांगायचं, तुम्ही जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा अपमान करत आहात. उद्याच्या सभेला बाबासाहेबांचे तुलना इतरांसोबत करू नका, अशी विनंती देखील यावेळी खरात यांनी केली आहे .

दरम्यान शरद पवार आणि राष्ट्रवादीला (NCP) जातीयवादी म्हणण्यापेक्षा, तुम्ही अगोदर चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे दर्शन घेतले का? वडूला जाऊन संभाजी महाराजांचे दर्शन घेतले का? अहिल्यादेवींचे दर्शन घेतलय का? असा सवाल करत सचिन खरात यांनी तुम्ही जातीयवादी आहेत की नाह ? हे अगोदर तपासा असा सल्ला देखील दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com