covid19 vaccine
covid19 vaccine

लसीकरणासाठी RT-PCR बंधनकारक नाही; आरोग्य विभाग

Published on

- प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोविड चाचणी corona test केल्याशिवाय लस covid19 vaccine मिळणार नसल्याची चर्चा सुरू आहे, तसेच ग्रामीण भागात काही ठिकाणी कोविड चाचणी केल्याचे प्रमाणपत्रे नसल्याने लस देण्यास नकार दिल्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, याबाबत लस घेताना कोविड चाचणीची प्रमाणपत्रे बंधनकारक नसून, नियमानुसार १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस द्यावी, असे स्पष्ट आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. (rtpcr-test-not-mandatory-for-vacination-says-health-department-satara-marathi-news)

लसीकरणास सुरवात झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांनी लस घेऊ नये, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. मात्र, लस घेताना कोविड चाचणी बंधनकारक असल्याचा कोणताही अध्यादेश आरोग्य विभागाने काढलेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लस घेण्यासाठी कोविड चाचणी बंधनकारक असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे, तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरालगतच्या एका गावामध्ये लसीकरण सुरू असताना कोविड चाचणीचे प्रमाणपत्र नसणाऱ्यांना अँटिजेन चाचणी करायला लावली होती. त्यामुळे पहिल्यांदा कोविड चाचणी करूया, मग लस घ्यायला जाऊ, असाही मतप्रवाह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तयार होऊ लागला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था तयार होऊ लागली आहे. याबाबत, आरोग्य विभागाने स्पष्टीकरण देऊन लसीकरणासाठी चाचणी बंधनकारक नसून, नियमानुसार ठरलेल्या प्रत्येकाला लस दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

covid19 vaccine
ED Notice: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरवात झाली. सुरवातीला लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू होती. मात्र, त्यानंतर जिल्ह्याला लशींचे अल्प डोस मिळू लागल्याने लसीकरण मोहीम मंदावली होती, तसेच ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर लसीकरणासाठी गोंधळ होऊ लागल्याने प्रशासनाने टोकण पद्धत सुरू केली. त्यामध्येही ग्रामीण भागासह शहरी भागात स्थानिक नेतेमंडळी दमदाटी देऊन टोकण घेऊ लागले. काही दिवसांपासून लसीकरणाला लागलेले ग्रहण आणखीनच वाढत जाऊन ग्रामीण भागात लसीकरणासाठी कोविड चाचणी बंधनकारक असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची धास्ती वाढल्याने लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

स्थानिक पुढाऱ्यांना थारा नको...

लसीकरण मोहीम सुरळीत सुरू असताना राजकीय पक्षांचे स्व:पुढारी असणारे लसीकरण केंद्रात येऊन टोकण घेऊन जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पहाटेपासून रांगेत उभे राहूनही टोकण मिळत नसल्याने माघारी फिरावे लागत आहे. यामध्ये राजकीय पुढारी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हेतू साध्य करत असून, आरोग्य विभागाबद्दल मात्र नागरिकांचे मत दूषित होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने नेतेमंडळींना थारा देणे बंद करण्याची आवश्‍यकता आहे.

लसीकरणासाठी कोविड चाचणी बंधनकारक नसून, १८ वर्षांवरील प्रत्येकाचे लसीकरण केले जात आहे. तसेच, लसीकरणासाठी कोविड चाचणी करण्याबाबत आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत असे डॉ. सचिन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com