रोहित पाटलांच्या वक्तव्याची चर्चा; 'तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार'

या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
रोहित पाटलांच्या वक्तव्याची चर्चा; 'तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार'
रोहित पाटलांच्या वक्तव्याची चर्चा; 'तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार'Saam TV

सांगली : सांगलीत कवठेमहांकाळ नगरपालिका (Kavathe Mahankal) निवडणुकीत प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत, यावेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सांगता सभेत रोहित आर.आर. पाटील (Rohit RR Patil) यांनी तुफान फटकेबाजी केली. निवडणुकीचा निकाल १९ तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.  या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.  

रोहित पाटलांच्या वक्तव्याची चर्चा; 'तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार'
महिला पोलीस अधिकाऱ्यावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न; API थोडक्यात वाचल्या

मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे, हे मला माहीत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे. जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत, त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत, हे माझ्या पुढे येऊन सांगावं,' असं आव्हान रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ प्रसंगी बोलताना दिले.

तर निवडणुकीचा निकाल १९ तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यांच्या हाती १५ वर्षे सत्ता होती. नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आले आहेत. रोहित पाटील यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com