'ED, IT भाजपच्या खिशात असेल, लाेकशाही नाही हे सिद्ध झालं'

Rohit Pawar
Rohit Pawar
Published On

महाळुंग- श्रीपूर : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जितेश अंतापूरकर हे माेठ्या मतांनी विजयी झाले. हा लोकशाहीचा, लोकांचा आणि मंत्री अशाेक चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांचा विजय आहे असे आमदार राेहित पवार यांनी महाळुंग श्रीपूर येथे नमूद केले. महाळुंग- श्रीपूर येथे आयाेजिलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मेळाव्यात आमदार राेहित पवार बाेलत हाेते. यावेळी आमदार राेहित पवार यांनी उपस्थितांना महाळुंग-श्रीपूरच्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे असे आवाहन केले. rohit pawar jitesh antapurkar nanded ncp bjp deglur biloli bypoll election saamnews

आमदार राेहित पवार म्हणाले ईडी ED, आयकर खाते Income tax, सीबीआय CBI या सर्व केंद्रीय यंत्रणा भाजपच्या खिशात असल्या तरी लोकशाही नाही हे नांदेड आणि दादर नगर हवेलीतील जनेतेून दाखवून दिले. त्यामुळे दपडशाही चालत नाही आणि त्यांना लाेकशाहीला 'खिशात' घालता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. शेवटी मतदार हाच सार्वभौम आहे, हे या निकालाने सिद्ध झाले.

Rohit Pawar
उदयनराजे भेटत नाहीत? तक्रार राहणार नाही! संकेतस्थळाचे लाेकार्पण

साेलापूरात पदवीधर मतदारसंघात चार उमेदवार महाविकासचे निवडून आले. यंदा नांदेडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे दुप्पट मताधिक्याने निवडून आलेत. ही लाेकशाहीची ताकद आहे. या परिसरात देखील लाेकशाही टिकावी यासाठी प्रयत्न करा असे आमदार राेहित पवार यांनी आवाहन केले. काेणी काय करीत आहे. काेण आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे याकडे लक्ष देऊन त्यास ताेडीस ताेड उत्तर देण्यासाठी नगरपंचायत निवडणुकीत युवा पिढीने उत्तर द्यायला हवे.

युवा पिढीने येथील १७ म्हणजेच सर्वच्या सर्व जागा निवडून आणायच्या आहेत. तसं मला वचन द्या. पुर्वीचे दिवस राहिलेले नाही याचा अंदाज सर्वांना आहे. त्यामुळे युवा पिढीस ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com