जुन्नर : '२०२४ नंतरचा काळ हा युवकांचा आमचाच असणार आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार आहे. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे मार्गदर्शन असेलच. पण निर्णय मात्र नवीन पिढीचे राहणार आहे', असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केलं आहे. (Rohit Pawar News In Marathi)
रोहित पवार आज, शनिवारी जुन्नर दौऱ्यावर होते. त्यावेळी जुन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील सत्तेच्या राजकारणाची गणितं जुन्या नाही तर तरुणांच्या हाती येणार असल्याचे संकेतच भर सभेत रोहित पवारांनी दिले आहे.
रोहित पवार म्हणाले, 'आम्ही जमिनीवर सोडून कधीच वागणार नाही. लोकांमध्ये जमिनीवर राहण्याची आणि मागच्या पिढीची शिकवण स्वीकारून ती आत्मसात केली आहे. २०२४ पर्यंत याच शिकवणीतून आम्ही चालणार आहे. मात्र, २०२४ नंतरचा काळ हा युवकांचा आमचाच आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार आहे. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच, निर्णय मात्र नवीन पिढीचे राहणार आहे'.
'तरुणांच्या हातात सत्तेची गणितं आणि निर्णय हे असेलच यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन करतील हे ही सांगायला रोहित पवार विसरले नाही. रोहित पवार पुढे म्हणाले,'राजकारणात येताना खूप पुढचा विचार करुन राजकारणात आलो केवळ पदासाठी नाही. मात्र, लांबचे राजकारण करत असताना सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही', असं म्हणत रोहित पवारांनी पुढची राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुढची सुत्र त्यांच्याच हाती येणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.