स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातले रस्ते खड्डेमय

खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातले रस्ते खड्डेमय
स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातले रस्ते खड्डेमयअभिजीत सोनावणे
Published On

नाशिक - स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक Nashik शहरातले रस्ते खड्डेमय झाले आहेत. शहरातील सिडको Sidko म्हसरूळ, गंगापूर रोड, आडगावसह सर्वच परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यात खड्डे Pits की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. खड्ड्यात साठणारे पावसाचे पाणी आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीचालकांना अपघाताला Accident सामोरे जावे लागत आहे.

हे देखील पहा -

अनेक ठिकाणी या खड्ड्यातून वाहन चालविणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून खड्ड्यात गाडी आदळल्याने गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरवर्षी पावसाळा येतो तसेच दरवर्षी नाशिकचे रस्तेही खड्डयात जात असल्याने दरवर्षी शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनतो. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी करून देखील त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातले रस्ते खड्डेमय
यवतमाळच्या रँचोची कमाल, बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक तीही भंगारातल्या सायकलपासून

तर कोट्यवधींचा खर्च करून तयार केले जाणारे रस्ते एकाच पावसाळ्यात खड्डेमय होत असल्याने रस्त्यांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यात माती अथवा मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जात असली, तरी पावसात माती वाहून जात असल्याने खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे शहरात स्मार्ट रस्त्यांच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे देखील खड्ड्यांच्या समस्येत भर पडली आहे. त्यामुळे नाशिककरांचा शहरातील प्रवासही त्रासदायक बनला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com