मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्याची अक्षरशः घसरगुंडी

दुचाकी गाड्या घसरून अपघातांना आमंत्रण
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्याची अक्षरशः घसरगुंडी
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्याची अक्षरशः घसरगुंडीअभिजीत सोनावणे
Published On

नाशिक - पावसामुळे Rain नाशकातल्या Nashik मुंबई-आग्रा Agra महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्याची Road Issue घसरगुंडी झाली असून या ठिकाणी गेल्या काही दिवसांत अनेक अपघात Accident झाले आहेत. उड्डाणपुलावर पडणारे पावसाचे पाणी थेट खाली रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावर चिखल होत असल्याने दुचाकी गाड्या घसरून अपघातांना आमंत्रण मिळत आहे. मात्र यावर महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून इथून प्रवास करावा लागत आहे.

अपघाताची दृश्य अगदी कुणाच्याही मनाचा थरकाप उडवतात. मात्र नाशिकमध्ये दरवर्षी पावसाळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर दररोज असे अनेक अपघात होतात. पाऊस सुरू झाला की उड्डाणपुलावरच पावसाचं पाणी खाली रस्त्याच्या दुभाजकावर पडतं.

हे देखील पहा -

दुभाजकामधील माती पाण्यासोबत वाहून रस्त्यावर येते आणि मग रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण होत. या चिखलामुळे गाड्या घसरून अनेक अपघात होतात. एक-दोन नव्हे तर दिवसभरात गाड्या घसरून येथे २० ते ३० अपघात होतात. त्यात अनेकांना किरकोळ स्वरूपात जखमा होतात, तर काही जण गंभीर जखमी देखील होतात.

दरवर्षी पाऊस सुरू झाला की उड्डाणपुलाखालील या रस्त्याची होणारी घसरगुंडी नित्यनेमाची झाली आहे. रस्त्याची घसरगुंडी झाली की, तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्याचे फवारे मारून रस्ता स्वच्छ करण्यात येतो. मात्र उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी खाली पडणार नाही, यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना महामार्ग प्राधिकरणाकडून केल्या जात नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून इथून प्रवास करावा लागत आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्याची अक्षरशः घसरगुंडी
अनोख्या प्रेमाची अनोखी कहाणी! हरवलेल्या पत्नीची भेट तब्बल 'पाच' वर्षांनी

या रस्त्यावरील ही समस्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहेत. जोरदार पाऊस सुरू असला की एखादा मोठा धबधबा कोसळावा, तसे पाण्याचे प्रपात वरून खाली रस्त्यावर कोसळतात. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात इथं रस्त्यावर चिखल आणि होणारे अपघात हे समीकरण बनले आहे. त्यामुळे नाशिकरांमध्ये संतापाचं वातावरण असून आणखी किती अपघात झाल्यावर अथवा कुणाचा बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com