नागपूर - शहरातील वाढती गुन्हेगारी पोलीस Police विभागासाठी डोकेदुखी ठरते आहे. दिवसागणिक वाढत असलेल्या गुन्हेगारी घटना नियंत्रणात आणण्यासाठी निर्ढावलेल्या गुन्हेगारांना वठणीवर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी संबंधित ब्लॅकस्पॉटवर सातत्यानं उपस्थिती रहावं म्हणून नागपूर पोलीस Nagpur Police विभागानं तंत्रज्ञानाच्या मदतीनं क्यू-आर कोड QR Code प्रणाली विकसित केली आहे. यामाध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांची रस्त्यावरील उपस्थिती वाढवण्यास मदत होणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.
हे देखील पहा -
गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचा ग्राफ वाढत चालला आहे. त्यामुळं यावर वचक ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांनी ही प्रणाली विकसित केलीय. नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याची हद्द तीन ते चार बिट मध्ये विभागण्यात आली आहे. प्रत्येक बीटमध्ये कमीत कमी पंधरा बीट पंचिंग पॉईंट निश्चित करून त्यावर वॉटरप्रूफ क्यू आर कोड बसविण्यात आले आहेत. अशाच प्रकारे परिमंडळच्या सहा पोलीस स्टेशनचे ३७७ बिट पंचिंग पॉईंट ठरवून सर्व पॉईंटवर सुद्धा क्यू-आर कोड बसवण्यात आले आहेत.
त्या बीट पॉईंटवर कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि बीट मार्शल दिवसपाळी आणि रात्री पाळीच्या वेळी प्रत्यक्षात स्पॉटवर जाऊन तो कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करतील. एका अप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व डेटा पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय आणि पोलीस ठाण्यातील निरीक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांकडून गस्त घालण्याचे प्रमाण वाढणार आहे. यामुळे शहरातील नागरिकानां सुरक्षित वाटेल आणि गुन्हेगारांवर अंकुश बसेल.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.