Nashik: Corona रुग्ण वाढल्यास निर्बंध कडक करणार; पालिका आयुक्तांचा इशारा

नाशिक शहरातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patient) संख्या ही धोक्याची घंटा असून रुग्णसंख्या आणखी वाढत गेली, तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
Nashik Corona Updates
Nashik Corona Updates Saam TV
Published On

नाशिक : नाशिक शहरातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patient) संख्या ही धोक्याची घंटा असून रुग्णसंख्या आणखी वाढत गेली, तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, अशी माहिती नाशिकचे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. तर वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा (School) सुरू ठेवायच्या की बंद? याबाबतचा निर्णय कोरोना आढावा बैठकीत सर्वानुमते घेतला जाणार असल्याचंही आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

Nashik Corona Updates
Bharati Pawar: आताच काळजी घ्या; केंद्र सरकार सर्व मदत करायला तयार

मागील 10 दिवसात नाशिक शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 500 ने वाढलीय. वाढती रुग्णसंख्या नाशिककरांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून (Municipal Administration) करण्यात आलं आहे. तसेच शहरातली सभागृह, मंगल कार्यालयं आणि लॉन्स पालिकेच्या रडारवर असून मर्यादेपेक्षा जास्त लोकांची गर्दी आढळल्यास तसंच नागरिकांनी कोरोना (Corna) नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा तसंच वेळप्रसंगी मंगल कार्यालयं आणि लॉन्स सील करण्याचा इशाराही पालिका आयुक्तांकडून देण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com