ग्लोबल टीचर रणजीतसिंह डिसलेंवर चौकशी समितीचे ताशेरे; अहवालातून अनेक खुलासे

Global Teacher Ranjit Singh Disale Latest News : नियुक्ती दिलेल्या शाळेत गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे कारण पुढे आले होते.
Global Teacher Ranjit Singh Disale
Global Teacher Ranjit Singh Disaletwitter/@ranjitdisale
Published On

सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjit singh disale) गुरूजींनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे. डिसले गुरुजींनी हा राजीनामा ७ जुलै रोजी दिला. डिसले गुरूजींच्या राजीनाम्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दरम्यान डिसले गुरुजी यांच्यावरील आरोपांबाबत पाच सदस्यीय समितीने अनेक खुलासे केले आहेत. (Ranjit Singh Disale News In Marathi)

हे देखील पाहा -

डिसले गुरुजींचे काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागामध्ये (Education Department) वाद झाले होते. ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिसले गुरूजी यांच्यावर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यांना नियुक्ती दिलेल्या शाळेत गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे कारण पुढे आले होते. याबाबात आता पाच सदस्यीय समितीने चौकशी करत अहवाल सादर केला आहे.

5 सदस्यीय चौकशी समितीचे निष्कर्ष खालीलप्रमाणे :

१) श्री डिसले यांना प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी माढा यांनी दिनांक १८.१२.२०१७ रोजी कार्यमुक्त केले असताना श्री डिसले हे दिनांक ५.२.२०१८ रोजी डायट वेळापूर या ठिकाणी हजर झाल्याचे दिसून येते. दिनांक १३.११.२०१७ ते ४.२.२०१८ या कालावधीतील कामकाज केल्याचे आदेश संबंधिताकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सदर कालावधी हा अनधिकृत आहे असे प्रथम दर्शनी दिसून येते.

२) श्री डिसले यांनी डायट वेळापूर याठिकाणी एकही दिवस उपस्थित राहून विहित कामकाज केल्याचे दिसून येत नाही. तथापि हजेरी पत्रकावरही त्यांनी प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये उपस्थित असल्याबाबत एकही स्वाक्षरी केलेली नाही. श्री डिसले यांनी डायट वेळापूर या ठिकाणी केलेल्या शैक्षणीक कामकाजाबाबत कोणतेही अभिलेखे / पुरावे, विहीत नमुन्यातील मासिक दैनदिनी डायट कार्यालयाकडे उपलब्ध नाहीत.

३) श्री डिसले यांचा मुळ प्रतिनियुक्ती कालावधी दिनांक १७.११.२०१७ असून ते दिनांक १३.११.२०१७ पासून शालेयकामी उपस्थित नव्हते तसेच ते दिनांक ५.२.२०१८ रोजी डायट वेळापूर कार्यालयात हजर झाले आहेत. दिनांक ३०.४.२०२० रोजी मुदत संपलेला असताना ते दिनांक १.५.२०२० रोजी त्यांच्या मुळ शाळेवर हजर होणे अपेक्षित असताना श्री डिसले हे दिनांक ६.१०.२०२० रोजी शाळेवर हजर झाल्याचे दिसून येते. यावरुन दिनांक १३.११.२०१७ ते दिनांक ४.२.२०१८ व दिनांक १.५.२०२० ते दिनांक ५.१०.२०२० या कालावधीत श्री डिसले यांनी कोठे काम केले याबाबत कोणतेही आदेश असल्याचे दिसून येत नाही.

४) श्री डिसले यांना डायट वेळापूर येथे प्रतिनियुक्तीने हजर होण्यासाठी नियमानुसार शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर श्री डिसले यांनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा संपुर्ण पदभार तेथील सेवेने कनिष्ठ शिक्षकांना देणे आवश्यक असताना तसे न करता फक्त कागदोपत्री सही करण्यापुरता पदभार श्री कदम यांना दिलेला आहे व आर्थिक पदभार हा स्वतःकडे ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून येते. सदर आर्थिक व्यवहार हा नियमानुसार केल्याचे दिसून येत नाही.

५) सोलापूर विज्ञान केंद्र याठिकाणी श्री डिसले यांनी कामकाज केल्याचे खुलाशात नमुद केले आहे परंतु प्रत्यक्षात विज्ञान केंद्र सोलापूर या कार्यालयाची माहिती घेतली असता त्यांनी सोलापूर विज्ञान केंद्र येथे कामकाज केले असल्याचे कोणतेही कागदोपत्रावरुन दिसून येत नाही तसेच त्यांनी ४८५ पानी दिलेल्या खुलासा पाहता सदर कालावधीत हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केल्याचे दिसून येत नाही. त्यांनी दिलेल्या खुलाशावरुन सदरचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने केल्याचे दिसून येते परंतु त्यांना सदर काम ऑनलाईन पध्दतीने करणेबाबत कोणतेही आदेश असल्याचे दिसून येत नाही.

Global Teacher Ranjit Singh Disale
ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा; कारण काय ?

६) जिल्हा परिषद सोलापूर व विज्ञान केंद्र सोलापुर यांच्यामध्ये झालेल्या MOU नुसार सदर उपक्रम हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलाकरीता आहे. परंतु श्री डिसले यांनी सदरच्या उपक्रमाचे बाहेरील देशामध्ये अथवा जिप शाळे व्यतिरीक्त सादरीकरण केल्याने MOU मधील नियमाचे उल्लघन केल्याचे दिसून येते. याबाबत श्री डिसले यांनी कोणतेही परवानगी वरिष्टाकडून घेतल्याचे दिसून येत नाही.

७) श्री. डिसले यांचे दि १३.११.२०१७ पासून दि ५.१०.२०२० या कालावधीत जि.प.शाळा कदमवस्ती (परितेवाडी), सोलापूर विज्ञान केंद्र, सिंहगड इन्टिस्टुट सोलापूर, डाएट वेळापूर यापैकी कोणत्याही ठिकाणी एन्ट्री, मस्टर, उपस्थिती पत्रक शेरेबुक, इत्यादी पैकी एक ही अधिकृत उपस्थिती पत्रक अथवा हजेरी नोंद उपलब्ध झालेले नाही. तसेच श्री डिसले हे ही उपरोक्त कालावधीतील अधिकृत अभिलेखे सादर करु शकले नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com