Shirdi Sai Baba Temple : साई संस्थानमध्ये फसवा कारभार; माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती

Shirdi News : शिर्डी साई संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने बनावट सुरक्षारक्षक भरती झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने चौकशी सुरू केली असून, यामध्ये मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
shirdi news
Shirdi Sai Baba Templesaam tv
Published On

अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई संस्थांमध्ये बोगस कारभार सुरु असल्याची बातमी समोर आली आहे. शिर्डीच्या साई संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे साई संस्थानच्या नोकरभरतीत घोटाळा झालाय का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिर्डीतील साई संस्थांमध्ये सुरक्षा विभागात माजी सैनिकांची नोकर भरती केली गेली. या नोकर भरती दरम्यान अनेक माजी सैनिक सामील झाले होते. सध्या संस्थानमध्ये कंत्राटी पद्धतीने ८४ माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. मात्र हीच नोकरी भरती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.. माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा आरोप केला जातो आहे. जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे..

shirdi news
Shirdi Sai Baba: साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दान पेटीतून लाखोंची रक्कम लंपास; CCTV व्हिडिओतून सत्य समोर

त्यामुळे आता जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. साई संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने नोकरभरतीत घोटाळा झालाय का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या घोटाळ्यावर साई संस्थान आता कोणता निर्णय घेणार हे पाहण महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com