Ratnagiri News : सख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू; आंजणारी नदीत शिंपले शोधताना दुर्घटना

Ratnagiri News : लांजा तालुक्यातील आंजणारी नदीत शिंपल्या शोधण्यासाठी नदीवर गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झालाय. मनीष नारायण शिंदे आणि प्रमोद नारायण शिंदे अशी या दोन भावांची नावं आहेत.
Ratnagiri News
Ratnagiri NewsSaam Digital

लांजा तालुक्यातील आंजणारी नदीत शिंपले शोधण्यासाठी नदीवर गेलेल्या सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झालाय. मनीष नारायण शिंदे आणि प्रमोद नारायण शिंदे अशी या दोन भावांची नावं आहेत. आंजणारी काजळी नदीतील खोल डोहाचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झालाय. सोबत बहीण आणि मामा देखील होते, एक बुडत असताना दुसरा वाचवायला गेला आणि त्याचाही बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अंजणारी गावावर शोककळा पसरलीय.

अंगावर वीज पडून ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

राज्यभर आज अवकाळी पावसाचं तांडव पहायला मिळालं. गारपीट वादळी वाऱ्यानं पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगावर विज पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. लावण्या हनुमंता माशाळे असं या मुलीचं नावं असून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळपासून कडक उन असताना अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी लावण्याच्या अंगावर वीज पडली. तीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यावेळी मुलीच्या नातेवाईकांचा सरकारी रुग्णालयात एकच आक्रोश केला. अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यामधून हळहळ व्यक्त होत आहे.

Ratnagiri News
Maharashtra Water Crisis: नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त, जनता हंडाभर पाण्यासाठी त्रस्त; ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई

बैल उधळले अन् गाडा थेट गर्दीत शिरला; धडक बसताच वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बैलाचा धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली. विष्णू गेनबा भोमे (वय ७०) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. भोमे हे शिंद गावातील रहिवासी होते. बैलाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Ratnagiri News
Solapur Heavy Rain : अक्कलकोटमध्ये अवकाळीचा तडाखा; नदीनाल्यांना पाणी आल्याने वाहतूक ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com