रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस; कुंभार्ली घाटात कोसळली दरड

आज सकाळपासून पुन्हा रत्नागिरीसह परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.
Ratnagiri Rain
Ratnagiri RainSaam Tv

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. कोकणातही मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. आज सकाळपासून पुन्हा रत्नागिरीसह परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आज चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात सोणपात्र वळणार दरड कोसळली आहे, त्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Ratnagiri Rain
राहुल शेवाळेंवरील अत्याचाराच्या आरोपांवर पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

चिपळूण- कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात सोणपात्र वळणार दरड कोसण्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. त्यांनतर जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून काही वेळातच वाहतूक सुरू करण्यात आली. सकाळपासून घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. घाटातील सोणापत्रा येथील एका वळणावर दरड कोसळली आणि या मार्गावरील वाहतूक बंद झाली. याची माहिती पोलीस (Police) व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना समजताच त्यांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून वाहतूक सुरू केली आहे.

Ratnagiri Rain
मोठी बातमी! शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

जयगड समुद्रात बुडालेले बार्ज गुहागर किना-यावर

जयगड समुद्रात पलटी झालेलं बार्ज गुहागर किना-यावर सापडलं आहे. गुहागर तालुक्यातील पालशेत किना-यावर हे बार्ज सापडले आहे. दरम्यान या जहाजाच्या अनुषंगाने भारतीय तटरक्षक दल, रत्नागिरी (ratnagiri) तसेच सिंधूदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील सर्व सागरी पाेलीस (police) ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले हाेते. (ratnagiri latest marathi news)

ज्यावेळी हे महाकाय बार्ज जयगडमधील खोल समुद्रात पलटी झाले. आणि त्याची माहिती प्रशासनास मिळाल्यानंतर सतर्कतेचे आदेश देण्यात आले हाेते. विशेषत: मच्छिमारांना तसेच सागरी किनार पट्टीवरील नागरिकांना पाण्यातून वाहून येणा-या काेणत्याही वस्तुंना हात लावू नये असे देखील आवाहन करण्यात आले हाेते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com