बलात्कार करणाऱ्या नगरसेवक पतीने केला पुन्हा विनयभंग

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील एका महिला नगरसेविकेच्या पतीने बलात्काराचा गुन्हा दाखल असतानाही त्याच महिलेचा पुन्हा विनयभंग केला आहे.
बलात्कार करणाऱ्या नगरसेवक पतीने केला पुन्हा विनयभंग
बलात्कार करणाऱ्या नगरसेवक पतीने केला पुन्हा विनयभंगदीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील एका महिला नगरसेविकेच्या पतीने बलात्काराचा गुन्हा दाखल असतानाही त्याच महिलेचा पुन्हा विनयभंग केला असून 'मी जगू देणार नाही' अशी धमकी दिल्याने शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

उदगीर शहर येथील नोबल कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेला एक जून पासून ते २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत सतत पाठलाग करून वाईट नजरेने बघणे व फिर्यादी महिलेचे समोर अश्लील भाषेत शेरेबाजी करणे, अश्लील हावभाव करीत त्रास देत होता. फिर्यादीची आई समजावून सांगण्यास गेली असता तिला 'ती कशी जगते मी बघतो' अशी धमकी दिली वगैरे मजकूर फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात फिर्यादीत दिल्याने आरोपी नगरसेवक पती मिर्झा अक्रम बेग (रा.समतानगर) डॅम रोड उदगीर याच्याविरुद्ध विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलात्कार करणाऱ्या नगरसेवक पतीने केला पुन्हा विनयभंग
Big Breaking : देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; सुरक्षा यंत्रणा सतर्क

विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा याच महिलेच्या फिर्यादीवरून या आरोपी वर दाखल झाला होता. या आरोपीस काही महिने अटकही झाली होती. तो जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा याच महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने या आरोपीने पाठलाग करून अश्लील शेरेबाजी व हावभाव करणे सुरु केले होते या आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपीला अटक करण्यात आली येथील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले असता न्यायालयाने या आरोपीस जामीन दिला असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com