रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर यांच्या भेटीला; अर्धा तास बंद दाराआड चर्चा

उद्याच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असल्याचे बोलले जात आहे.
Political News
Political NewsSaam Tv

जालना - लोकसभा निवडणुकी नंतर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर दानवे-खोतकर असा वाद शिंगेला पोचला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांची भेट घेऊन बंद शमवले होते. त्यानंतर ईडी चौकशी मुळे खोतकर चांगलेच अडचणीत आले असतांना त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. (Latest Marathi News)

Political News
Pune : महिलेच्या वेशात फिरत होता तरुण; स्थानिकांनी धू-धू धुतलं; Video Viral

अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार अशी बातमी ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पसरवल्याची चर्चाचा आरोप ही खोतकर गटाकडून करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा व्हिडीओ दानवे यांनीच काढून मीडियाला पाठवला असा ही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अर्जुन खोतकर शिंदे गटात गेल्याने कुठं तरी खोतकर दानवे वाद संपला अस समजलं जातं असताना खोतकर यांनी लोकसभा आता तरी आम्हला सोडावी अशी मागणी एका कार्यक्रमात केली होती.

दोघात वाद आजून कायम असल्याचं बोलले जात असताना उद्या मुंबईत होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खोतकर हे आज १५०० वाहन घेऊन मेळाव्यासाठी जाणार असतांना दानवे आज अचानक अर्जुन खोतकर यांच्या निवास्थानी दाखल झाल्याने शहरात चर्चाना उधाण आलं आहे.

अर्धा तास दानवे आणि खोतकर यांच्यात बंद दारआड चर्चा झाल्याने नेमक्या ह्या चर्चा कशा संबंधी सुरू आहे या चर्चाना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकी नंतर दानवे पहिल्यांदा खोतकर यांच्या बंगल्यावर अचानक दाखल झाल्याने चर्चाना उधाण आलं आहे. तर उद्याच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com