स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीत सेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय....या वादाचं लोण आता तळकोकणात पोहोचलंय.. शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनी तर थेट सिंधुदुर्गात महायुतीचा नाही तर शिंदेसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष असेल असा विश्वास व्यक्त केलाय.. तर दुसरीकडे त्यांचे भाऊ आणि मंत्री नितेश राणेंनीही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आपणच जिंकणार, असा दावा केलाय.. त्यामुळं कोकणात राणे विरुद्ध राणे असाच एकाच घरात टोकाचा संघर्ष रंगणार आहे...
खर तर सिंधुदुर्गातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली ती नितेश राणेंच्या वक्तव्याने.. नितेश राणेंनी स्वबळाचा नारा देत कोकणावर वर्चस्व राखण्याची भाषा केली.. त्यानंतर आधी निलेश राणे आणि आता थेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी नितेश राणेंना खोचक टोला लगावलाय.. फक्त सिंधुदुर्गच नाही तर कोकणातील तिन्ही जिल्ह्यात महायुतीत स्वबळाची चाचपणी केली जातेय.. मात्र या तीन्ही जिल्ह्यातील राजकीय समीकरणं कशी आहेत?
रायगड जिल्ह्यातील 7 पैकी भाजपने 3, शिंदेसेना 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात 5 पैकी शिंदेसेनेचे 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे.. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 3 पैकी केवळ 1 आमदार भाजप तर 2 आमदार शिंदेसेनेचे आहेत.
खरंतर रायगडमध्ये सुनील तटकरे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणेंचा वरचष्मा आहे.. मात्र एकूण कोकणाचा विचार केला तर शिंदेसेनेकडे सर्वाधिक 8 आमदार आहेत..त्यामुळे कोकणात शिंदेसेनेचा वरचष्मा आहे.. मात्र फक्त आमदार आणि खासदार यावरच कोकणाचं राजकीय गणित अवलंबून नाही... तर 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेचं गणितही लक्षात घेणं गरजेचं आहे..
सिंधुदुर्गात तत्कालिन शिवसेनेने 50 पैकी 31 जागा जिंकूनही भाजपच्या नारायण राणे समर्थक संजना सावंत जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्या.. तर 55 पैकी 39 जागा जिंकून रत्नागिरीत शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्या.. तर रायगडमध्ये 47 पैकी 20 जागा जिंकून शेकापच्या योगीता पारधेंनी मुसंडी मारली..कोकणात शिंदेसेनेचे 3 मंत्री आहेत. भाजपचे नितेश राणे एकमेव मंत्री आहेत.. आता निलेश राणे मंत्री नसले तरी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ते अधिक आक्रमक झाल्यास कोकणात राणे बंधूंमधील वर्चस्वासाठी रंगलेला संघर्ष आणखी तीव्र होणार हे मात्र निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.