नागपूर : नवीन साखर कारखान्याला (Sugar factory) हमी देऊ नका, पण नवीन साखर कारखाना स्वतःच्या हिमतीवर कुणी उभा करत असेल तर त्याला का अडविता, त्यालाही परवानगी द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील कोणत्याही कारखान्यांना हमी द्यायची नसल्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला असल्याची घोषणा विधान सभेत केली. आता इथून पुढे राज्य सरकारवर कारखाने अवलंबून राहू नयेत, असही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर आता राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, इथेनॉल चा इतका धिंडोरा करता मग साखरे ऐवजी जर एथोनॉल तयार करत असेल तर त्याला करू द्या. साखर कारखाने काढून यांचं पोट भरलं आहे, त्यामुळं इतरांनी काढू नये, यांची मक्तेदारी मोडू नये यासाठी हा खटाटोप असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.
लोकं जोड्याने मारतील...
दुसऱ्या कुणाला घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करायची आणि मग भाडेतत्त्वावर द्यायचे. आधी गुन्हेगारांचं, दाऊदचं टोळीयुद्ध बघितलं आता राजकीय टोळी युद्ध बघतोय, एकमेकांवर आरोप करायचे, कारवाई करायची, वस्त्रहरण कारायचं याची आम्हाला आता किळस यायला लागली आहे. दैनंदिन प्रश्नांकडे सत्तापक्ष आणि विरोधी पक्षाने बघावे, राज्यात अनेक प्रश्न आहेत.
विधानसभेत लोकांच्या प्रश्नावर किती चर्चा झाली? केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे, जनता याला कंटाळली आहे. लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत की नाही? नाहीतर लोकं जोड्याने मारतील.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.